प्रत्येक विद्यार्थ्यांचा 1कोटींचा विमा उतरवून लॅपटॉप कॉम्पुटरसह इंटरनेट मोफत द्यावे
प्रत्येक विद्यार्थ्यांचा 1कोटींचा विमा उतरवून लॅपटॉप कॉम्पुटरसह इंटरनेट मोफत द्यावे
नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
नातेपुते प्रतिनिधी..
कोरोना covid-19 विषाणूंचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात लॉकडाऊन आहे या दरम्यान विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू होण्यास विलंब होत आहे महाराष्ट्र शासनाने टप्याटप्याने शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे व पालकांवर शिक्षकांवर काही जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत विद्यार्थ्यांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने covid-19 विषाणूचा संसर्ग जलदगतीने विद्यार्थ्यांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या व सर्वच प्रकारच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते सातवी वर्गातील विद्यार्थ्यांचा प्रत्येकी एक कोटी रुपयांचा विमा काढावा यासाठी कोणत्याही प्रकारच्या नियम अटी ठेवू नयेत.आजचा विद्यार्थी हा उद्याच्या भारताचा सुजाण नागरिक आहे.
काही ठिकाणी डिजिटल वर्ग सुरू झालेत परंतु लाखो विद्यार्थी गरीब असल्यामुळे त्यांच्या कडे लॅपटॉप कॉम्प्युटर इंटरनेट अशी अद्ययावत साधनसामग्री नसल्यामुळे विद्यार्थी डिजिटल शिक्षणापासून वंचित राहत आहेत त्यामुळे राज्य शासनाने सर्व शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना लॅपटॉप कॉम्प्युटर इंटरनेट मोफत उपलब्ध करून द्यावे आणि मगच डिजिटल शिक्षण पद्धती सुरू करावी देशात लोकसभा राज्यसभा विधानसभा व विधान परिषदेचे कामकाज अद्याप सुरू झालेले नाही हे कामकाज सुरू करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार कोरोना covid-19 विषाणूचा संसर्ग खासदार व आमदारांना होऊ नये म्हणून खबरदारी घेत असल्याचे दिसून येत आहे अशी परिस्थिती असताना शाळा सुरू करण्याचा निर्णय आत्मघाती निर्णय होऊ शकतो विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता वर्ग अपुरे पडू शकतात योग्य फिजिकल डिस्टन्स ठेवता येणार नाही अगोदरच विद्यार्थ्यांची संख्या जास्त व बसण्याची क्षमता व वर्ग कमी आहेत ही सत्यता आहे.
त्यामुळे सर्व शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याचा एक कोटी रुपयांचा विमा काढून प्रत्येकास लॅपटॉप कॉम्प्युटर व इंटरनेट मोफत उपलब्ध करून द्यावे सर्व प्रतिबंधात्मक सोयी सुविधांच्यानंतरच प्रत्यक्ष शाळा सुरू कराव्यात शासनाने योग्य उपाययोजना न करताच शाळा सुरू केल्यास प्रशासनाने योग्य खबरदारी न घेतल्यास आणि सर्व जाती धर्मांच्या विद्यार्थ्यांबाबत कोरोना covid-19 विषाणू संसर्गाबाबत अनुचित घटना घडल्यास त्यास राज्य शासन व प्रशासन जबाबदार असेल
असे निवेदन नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या वतीने ऍड.डॉ.केवल उके यांच्या मार्गदर्शनात आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते विकास दादा धाइंजे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य सचिव वैभव तानाजी गिते यांच्या नेतृत्वात माळशिरस प्रांत अधिकारी शमा पवार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.यावेळी संजय झेंडे,बाबासाहेब सोनवणे, सौरभ वाघमारे,धनाजी शिवपालक,संभाजी साळे हे उपस्थित होते.निवेदनाच्या प्रती शिक्षण मंत्री आरोग्य मंत्री व संबंधितांना पाठविण्यात आल्या आहेत अशी माहिती एन.डी.एम.जे चे प्रसिद्धी प्रमुख प्रमोद ज्ञानदेव शिंदे यांनी दिली आहे