पिरळे येथे गँगवार लोखंडी गज व तलवारीने हाणामारी,दोन गटातील चार जण गंभीर जखमी*

पिरळे येथे गँगवार,दोन गटातील चार जण गंभीर जखमी*
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रमोद शिंदे) मौजे पिरळे(ता.माळशिरस) दि.२१ जून रोजी सकाळी १०.३०वा येथील राजेश नाथा दडस व नवनाथ तांबीले ( दोघेही रा.पिरळे, ता. माळशिरस ) हे दोघे चव्हाणवाडी (बांगार्डे) येथील बिरोबा देवाच्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते.या ठिकाणी त्यांच्यावर सहा जणांनी नातेवाईकांना झालेला मारहाणीचा वादाचा राग मनात धरून तलवारी व लाठया काठ्यानी वार करून‌ गंभीर जखमी केले घटना घडली.
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर हकिकत अशी‌ की; सुरुवातीला अण्णा बुधावले व तुकाराम लवटे यांच्यात भांडणे झाले असतात त्यानंतर दत्तू लवटे,तुकाराम लवटे,बापू लवटे, नाथा लवटे ,नाना लवटे,यांनी शिवनेरी हॉटेल समोर झालेल्या भांडणाचा राग मनात धरून अण्णा बुधावले व अंकुश चव्हाण यांना लोखंडी गज व काठीने मारहाण केली त्यात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अकलूज येथे उपचार सुरू आहेत यासंदर्भात नातेपुते पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली त्यानंतर दुसऱ्या दिवशी चव्हाणवाडी येथील बिरोबा देवाच्या दर्शनासाठी आलेल्या राजेश दडस ,नवनाथ तांबीले यांना सचिन विठ्ठल बुधावले, दिपक विठ्ठल बुधावले, बिरू बिट्टू बुधावले ,राजू भाळे, शंकर बोडरे, अमोल जाधव,या इसमानी दुचाकीवरून येवुन तुमचे नातेवाईक दत्तू लवटे यांनी, आमचे नातेवाईक सुकुमार उर्फ अण्णा बुधावले ,अंकुश चव्हाण यांना का मारहाण केली यांचा जाब विचारत हल्ला करत राजेश दडस व नवनाथ तांबीले यांच्यावर या सहा इसमांनी तलवारीने व लोखंडी पाईप तसेच लाठी काठीने जोराचे वार केले .यामध्ये राजेश व नवनाथ दोघेही गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांच्यावर अकलूज येथील दवाखान्यांमध्ये उपचार सुरू आहेत . नातेपुते पोलीस स्टेशन येथे राजेश‌ नाथा दडस यांनी या सहा इसमांच्या विरोधात फिर्याद दिली आहे .
सदर घटनेतील आरोपींवर गुन्हा रंजि.नं १८५ /२० भा.द.वि कलम ३०७,५०४,५०६, १४३,१४७,१४९तसेच शस्त्र अधिनियम मु.का १३५ प्रमाणे नातेपुते पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवला आहे.घटनेतील सर्व संशयित आरोपी फरार असून .सदर घटनेची माहिती मिळताच अकलूज उपविभागीय पोलीस उपअधीक्षक नीरज राजगुरू यांनी घटनास्थळी भेट दिली. सदर घटनेचा पुढील तपास नातेपुते पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी एपीआय युवराज खाडे करीत आहेत. या घटनेमुळे पिरळे आणि परिसरातील वातावरण दहशतीचे निर्माण झाली आहे तसेच पिरळे ग्रामस्थांकडून कायम शांतता राहण्यासाठी पिरळे येथे कायमस्वरूपी पोलीस चौकी करण्यात यावी व येथील अवैद्य दारूचे धंदे बंद करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच एका महिन्यामध्ये कलम 307,326,324 ॲट्रॉसिटी सारखे गंभीर प्रकारचे सात गुन्हे दाखल झाले असून येथील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वेळीच प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पावले उचलण्यात यावी व शांतता कमिटीची बैठक घेण्यात यावे या संदर्भात ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.

You may have missed