कोथळे घाटात भाविकांना लुटणाऱ्या दरोडेखोरांना नातेपुते पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कोथळे घाटात भाविकांना लुटणाऱ्या दरोडेखोरांना नातेपुते पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (नातेपुते) प्रमोद शिंदे- कोथळे घाट तालुका माळशिरस येथे भाविकांना लुटणाऱ्या दरोडेखोरांना नातेपुते पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत
उमरगा व चिवरी ता तुळजापूर येथील महिलाभाविक भक्त जेजुरी येथील देवदर्शन करून शिंगणापूर येथील महादेवाचे दर्शन करण्यासाठी चाललेली असताना नातेपुते पोलिस स्टेशन हद्दीतील फलटण ते शिंगणापूर रोडवरती मौजे कोथळी ता.माळशिरस कोथळे घाटात दिनांक 11 मार्च 2020 रोजी संध्याकाळी दहा च्या सुमारास भाविकांची क्रूजर गाडी अडवून अनोळखी सहा इसमांनी गाडीच्या काचा फोडून गाडीतील महिलांना व पुरुषांना शिवीगाळ दमदाटी करून एक लाख पाच हजार सहाशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेले. याबाबत नातेपुते पोलिसात चैतन्य सखाराम बडूरे 30 गाडी ड्रायव्हर राहणार यवती ता.तुळजापूर याचे फिर्यादीवरून भाग पाच गुन्हा रजिस्टर नंबर 80/ 20 भादवि कलम 395,341,327,504,506 अन्वये गुन्हा दाखल झाला होता.
यावर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण चे मनोज पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे सूचनेप्रमाणे अकलूज उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास नातेपुते पोलीस ठाण्याचे एपीआय युवराज खाडे हे करीत होते.
सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गोपनीय बातमीदार मार्फत व तांत्रिक माहिती मिळून सदर गुन्हा करणारे संशय हे फलटण तालुक्यातील गोखळी गावात वीटभट्टीवर काम काम करत असले बाबत माहिती मिळाली सदर ठिकाणी चौकशी करता आरोपी हे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातील असल्याचे समजले सदर आरोपींचा शोध घेण्यासाठी नातेपुते पोलीस स्टेशन येथील पथक तयार करून आरोपींना शोधण्यासाठी रवाना केले, आरोपींचा शोध घेत असताना संशयित इसमनामे राहुल आप्पासाहेब माळी वय 19 राहणार मुसळवाडी ता.राहुरी जिल्हा अहमदनगर, राहुल उर्फ टग्या एकनाथ बर्वे 22 पडेगाव ता.श्रीपुर संदीप सुरेश पिंगळे वय 22 वर्ष मानेगाव ता.सिन्नर यांना ताब्यात घेऊन त्‍यांच्‍याकडे पोलीस खाक्या दाखवत तपास केला असता सदरचा गुन्हा हा त्यांचे इतर साथीदाराच्या मदतीने केला असल्याचे कबूल केले आहे.सदर आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता आरोपींना दिनांक 6/7/2020 पर्यंत पोलिस कस्टडी व रिमांड मंजूर केले असून गुन्ह्याचा अधिक तपास युवराज खाडे हे करीत आहेत उर्वरित चार आरोपींचा शोध चालू आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे,उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली ए.पी.आय युवराज खाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल गडदे, शरद कदम,राहुल रणवरे ,राकेश लोहार,पोलीस नाईक महेश पाटील,सायबर शाखेचे रवी हातकीले,आर.एम.लांडगे,गोपनीय विभाग शिवकुमार मदभावी,बबलू गाडे यांनी कामगिरी केली असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास युवराज खाडे करीत आहे. या कामगिरीमुळे परिसरातील लोकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे.

कोथळे घाटात दरोडेखोरांनी चिवरी येथील भाविकांची गाडी फोडून भाविकांना दमदाटी करून सोन्याचे दागिने व पैसे लंपास केले
हेच ते भाविक