बौध्द अनुसूचित जाती-जमातींच्या हक्काचा निधी कोरोना साठी वळवू नये*
वळवल्यास महाराष्ट्रभर आंदोलन छेडणार असल्याचा एन डी एम जे चा इशारा
प्रमोद शिंदे (नातेपुते शासनाकडील बौद्ध अनुसूचित जाती जमाती हक्काचा निधी कोरोना साठी वळवू नये वळवल्या महाराष्ट्रभर आंदोलन छेडणार असल्याचा इशारा उप विभागीय दक्षता नियंत्रण समिती सदस्य विकास दादा धाइंजे व एन डी एम जे चे राज्य सचिव वैभव गिते यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून दिला आहे.
माजिक न्याय व विशेष सहायय विभागाअंतर्गत अनुसूचित जाती,बौद्ध घटकांकरिता व त्यांच्या प्रगतीचा असलेला कोट्यवधी रुपयांचा निधी (बजेट) कोरोना covid-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वळवण्याची शक्यता नाकारता येत नाही.कोरोना कोविड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधी,महसूल,सार्वजनिक बांधकाम,आरोग्य व वनविभागाचा हजारो कोटी रुपये निधी शासनाकडे आहे
कोरोनाच्या कोविड 19 विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बौद्ध अनुसूचित जातीच्या नागरिकांची परिस्थिती हालाखीची झाली आहे उदरनिर्वाहाचे साधन फक्त मजुरी असल्याने दोनवेळच्या जेवणाची भ्रांत पडली असून अनेक कुटुंब फक्त भात खाऊन उपाशी झोपत आहेत.अनेक कुटुंब उपासमारीने आत्महत्या करीत आहेत.तर अन्याय अत्याचाराने परमोच्च बिंदू गाठला आहे.
त्यामुळे बौद्ध,अनुसूचित जातीतील नागरिकांचे व त्यांच्या विद्यार्थ्यांच्या हक्काचा व त्यांच्या योजनांसाठी वापरण्यात येणारा अर्थसंकल्पीत निधी महाराष्ट्र सरकारने कोरोना विषाणू किंवा अन्य कारणे सांगून वळवू नये
याउलट सामाजिक न्याय व विशेष सहायय विभागाअंतर्गत असणाऱ्या सर्व योजना प्रभावीपणे राबवाव्यात विध्यार्थ्यांच्या शिष्यवृत्या वेळेवर द्याव्यात,मिनी ट्रॅक्टर ऐवजी मोठे ट्रॅक्टर द्यावेत, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेची व्याप्ती वाढवून चालू बाजारभावाप्रमाणे जमिनी विकत घेऊन अथवा शासनाच्या ताब्यातील जमिनी भूमिहीनांना द्याव्यात.एट्रॉसिटीऍक्ट अंतर्गत अत्याचारात बळी पडलेल्या पीडितांना तात्काळ अनुदान वितरीत करावे. प्रत्येक तालुक्यात दलित वस्ती सुधार योजनेचा,रमाई आवास योजनेचा निधी वर्ग करावा .
माध्यमिक,उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यावर वर्ग करावी
कोरोना कोविड 19 या विषाणूचे कारण देत जर बौद्ध,अनुसूचित जाती,जमातींचा (दलित-आदिवासींचा)प्रगतीचा निधी वळवण्याचा प्रयत्न केला किंवा जाणूनबुजून अखर्चित ठेवण्याचा प्रयत्न केल्यास तर नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस व सर्व पुरोगामी विचारांच्या संस्था संघटनांना सोबत घेऊन महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल होणाऱ्या परिणामास सरकार जबाबदार राहील याची असा इशारा वैभव तानाजी गिते
विकास दादा धाइंजे उपविभागीय दक्षता समिती सदस्य, वैभव तानाजी गीते राज्य सचिव एन डी एम जे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. सदर निवेदन वर विकास धाईंजे, वैभव गिते, राज्य प्रसिद्धीप्रमुख तथा एम पी पी एस जिल्हाध्यक्ष प्रमोद शिंदे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय झेंडे, पश्चिम महाराष्ट्र सचिव बाबासाहेब सोनवणे, सोलापूर जिल्हा सचिव वैभव काटे माळशिरस तालुका अध्यक्ष दत्ताा कांबळे आदींच्या सह्या आहेत.



