*बेशिस्त वाहनचालकांवर नातेपुते पोलिसांकडून कार्यवाही सुरू *
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- नातेपुते (प्रमोद शिंदे )-नातेपुते आणि परिसरात बेशिस्त पणे व covid-19 च्या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी यांनी घालून दिलेल्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवरती नातेपुते पोलिसांच्यावतीने कारवाई करण्यात येत आहे.सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय मिलिंद शंभरकर यांनी दिनांक 5 जुलै रोजी कोरणा विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून काही नियमावली आखून दिली आहे.या नियमावलीचे उल्लंघन केल्यास उल्लंघन करणाऱ्या लोकांवरती दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. या नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलीस प्रशासन व इतर प्रशासकीय यंत्रणा यांना दिले आहेत. या आदेशाचे पालन नातेपुते पोलीस प्रशासनाच्या वतीने काटेकोरपणे करण्यात येत आहे.नातेपुते येथे दुचाकीवर डबलसीट,ट्रिपल सीट विनाकारण फिरणारा वर व मास्क विना फिरणारा वर दंडात्मक खडक कारवाई सुरू केली आहे. सदर कारवाई मास्क न वापरल्यास 100 रुपये दंड,दुचाकीवर दोघे प्रवास केल्यास 500 रुपये दंड, चार चाकी व तीनचाकी तीन व्यक्तींनी पेक्षा जास्त व्यक्ती बसल्यास प्रत्येकी 500 रुपये,निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ दुकान सुरू ठेवल्यास1000 रुपये दंड, अत्यावश्यक सेवा वगळून साठ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मालक किंवा नोकर दुकानात आढळल्यास सात दिवस दुकान आदिवस दुकान सील करण्यात येणार असून होम कारण टाईम न पाळल्यास 1000 रुपये, दंड सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 200 रु ,दुकानात पाच पेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास 500 रु, सार्वजनिक सार्वजनीक दारू,पान,तंबाखू सिगरेट चे सेवन केल्यास 500 रु, फळविक्रेते भाजीवाले मास्क न वापरल्यास 100 रूपये,अशाप्रकारे दंडात्मक कारवाई करून दंड वसूल करण्यात येणार आहे दिवसभरात 47 लोकांवरती कारवाई करण्यात आली ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.तरी पोलीस प्रशासनाकडून परिसरातील लोकांना नियमांचे उल्लंघन न करण्याचे आव्हान करण्यात आले आहे नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल येईल असा इशारा देण्यात आला आहे.