*पुरोगामी महाराष्ट्राची शान अण्णाभाऊ साठे*
*पुरोगामी महाराष्ट्राची शान अण्णाभाऊ साठे*
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ( प्रमोद शिंदे )-ये आझादी झुठी है देश कि जनता भुकी है…
ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती येथील शोषित पीडित दलित कष्टकरी नाहिरे वर्गाच्या यांच्या तळहातावर तरलेली आहे.
जग बदल घालुनी घाव मज सांगून गेले भीमराव .
हे अवघ्या महाराष्ट्राला ठणकावून सांगणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. साहित्यरत्न साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची शंभरावी जयंती, ही जयंती आज संपूर्ण जगभरात मोठ्या दिमाखात साजरी झाली असती परंतु सध्या जगामध्ये covid-19 कोरणा प्रादुर्भावाने थैमान घातला आहे.यामुळेआज अण्णाभाऊंची जयंती घराघरात वैचारिक पद्धतीने आपण देशभर मोठ्या उत्साहात साजरी करत आहोत.उपेक्षित शोषित पीडित कष्टकरी कामगार त्यांचं दुःख साहित्यातून मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पुरोगामी महाराष्ट्रासाठी भरीव असं योगदान आहे.त्यांचं साहित्य लिखाण महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता सातासमुद्रापलीकडे म्हणजे जगभरात गाजले.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म कोल्हापूर आणि सातारा च्या मध्यभागी डोंगर पायथ्याशी वसलेल्या वाटेगाव या निसर्गाने नटलेल्या गावी कृष्णा आणि वारणा नदीच्या परिसरात वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला.त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊ साठे आईचे नाव वालुबाई राघोबा साठे असे होते.अण्णाभाऊ चे शिक्षण अगदी दीड दिवसाचे कुलकर्णी नावाच्या मास्तरने अण्णाभाऊंना मारले त्यामुळे अण्णाभाऊंनी शाळेकडे पाठ फिरवली. कुटुंबाची दारिद्र्य पराकाष्टा पाहून रोजगारासाठी त्यांच्या वडिलांनी मुंबईचा रस्ता धरला चार मुले व पत्नी घेऊन ते पायी मुंबईच्या दिशेने निघाले 1931 आली भाईखेळा येथे चांदबिबीच्या चाळीमध्ये जिन्याखाली आपला फाटका संसार मांडला.मिळेल ते काम मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागले. त्यात अण्णाभाऊंची ओळख एका कापड विक्रीकाशी झाली.कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अण्णाभाऊ ने कापड विक्रीचा व्यवसाय सुरू केला व ते कपड्याचे गाठोडे घेऊन अण्णाभाऊ मुंबईच्या रस्त्याने वन वन फिरत होते.त्यामुळे त्याचा रोजीरोटीचा प्रश्न काहीसा मिटला होता.त्यानंतर माटुंगा येथील लेबर कॅम्प मध्ये राहावयास गेले लेबर कॅम्प म्हणजे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या मानव मुक्ती लढ्याचा बालेकिल्लाच होता.याच बालेकिल्ल्यात अण्णा भाऊंसारखा साहित्यसम्राट घडत गेला आणि अख्ख्या जगाला तो लेखणीच्या माध्यमातून कळाला.त्यांच्यात लपून बसलेला विद्रोही लेखक अखेर साहित्याच्या माध्यमातून बाहेर आला.कम्युनिस्टांच्या स्टडी सर्कल मुळे अण्णाभाऊंच्या लेखणीला धार मिळत गेली. 1946 साली टिटवाळा येथे शेतकरी परिषद भरली त्याच ठिकाणी लाल बावटा कला पथकाची स्थापन झाले.आणि शाहीर अमर शेख शाहीर,गव्हाणकर यांच्या साथीने अण्णाभाऊ लोकशाहीर झाले.15 ऑगस्ट 1947 रोजी मिळालेल्या स्वातंत्र्यावर अण्णाभाऊ नाखूष होते.इंग्रजांच्या पारतंत्र्यातून ब्राह्मण प्रस्थापित वर्ग स्वतंत्र झाला परंतु बहुजन वर्ग मात्र गुलामच आहे हे त्यांच्या निदर्शनास आले. म्हणूनच ते म्हणतात ये आजादी झुठी है देश कि जनता भुकी है. महाराष्ट्राची परंपरा या पोवाड्यात बहुजन पुरुषांच्या आदर्शाचा गौरव करतात तसेच मनुवादी विचारधारा जोपासणाऱ्या ची चिरफाड करतात अण्णाभाऊ साठे यांनी सुरुवातीला पुरोगामित्वला पोषक ठरणारी प्रेरक ऊर्जा कम्युनिस्ट कडून घेतली त्यांच्या नंतर लक्षात आले भारतात वर्ग नाहीतर जाती आहेत.जातीव्यवस्था हे मनुवाद्यांचे आपत्य आहे जोपर्यंत जातिव्यवस्था आहे तोपर्यंत एक संघटन शक्य नाही. म्हणून अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या पुरोगामीतत्वाला प्रेरक ऊर्जा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून घेतली आणि आपल्या शाहिरीच्या माध्यमातून व्यवस्था परिवर्तनाची ललकारी ठोकली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली त्याकाळी 1936 ते 1941 या काळात मोठी राजकीय लढाई उभी केली होती.या दलित उद्धरण्या च्याआंदोलनाने अण्णाभाऊ साठे भारावून गेले होते.अण्णाभाऊ साठे म्हणतात “ज्या धनिक शहानी धर्मांधांनी दलित समाजाचा हत्ती व्यवस्थेच्या चिखलात घालून रुतून ठेवला आहे”त्यांनी आम्हाला कलंकित अवमानित केले आहे.तेव्हा आपली एकजूट करून या विषमता मूलक समाजव्यवस्थेवर आपल्या विचारांचा जोरदार घाव घालू व अन्यायसमाज व्यवस्था मोडून टाकू व गुलामगिरीतून मुक्त होऊन आपला स्वतंत्र समतेवर आधारित वेगळी समाज व्यवस्था निर्माण करू. ज्या समाजव्यवस्थेने नाकारले आहे त्यांची गुलामी पत्करणे शक्य नाही. म्हणून ती व्यवस्था झुगारून नवीन समाज व्यवस्था निर्माण केली पाहिजे या मताशी अण्णाभाऊ ठाम होते. सध्या आपण एकविसाव्या शतकात वाटचाल करत असून अजूनही समाजव्यवस्था बदललेली नाही जैसे थे आहे. फक्त अन्याय-अत्याचाराच्या पद्धती बदलल्या आहेत. आजही असंघटित असल्यामुळे बौद्ध समाज व मातंग समाज,दलित समाज यांना अन्याय-अत्याचाराला पावलोपावली समोर जावे लागत आहे. याची कित्येक उदाहरणे महाराष्ट्रात पाहावयास मिळत आहेत.चंद्रकांत गायकवाड सारख्या तरुणाचा दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या केली जाते.आमच्या भगिनीवरती दिवसाढवळ्या बलात्कार केला जातो कसली मानसिकता.यात आता बदल झाला पाहिजे अन्याय अत्याचाराला वाचा फुटली पाहिजे.अखिल भारतीय साहित्य संमेलन मुठभर लोकांच्या हाती असून आपले स्वतंत्र वेगळे साहित्य संमेलन निर्माण केले पाहिजे. असे अण्णाभाऊंना प्रकर्षाने वाटत होते.त्यांनी मुंबई 1958 साली भरलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलन उद्घाटक म्हणून केलेल्या भाषणात प्रकर्षाने जाणवते.अण्णाभाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील योगदान बहुमूल्य आहे.त्यांनी निर्माण केलेल्या साहित्याने जगभरात मराठी आणि महाराष्ट्र राज्याची मान निश्चितपणे उंचावली आहे.त्यांनी कामगार लढ्यातील संपातील यांच्या जीवनावर गाणी लिहिली अण्णाभाऊंनी फकीरा,चित्रा,वैजंता,वारणेचा वाघ अशा अनेक कथा कादंबऱ्याच लेखन केलं. अण्णाभाऊंनी एकंदर30 कादंबऱ्या, 22 कथा एक प्रवास वर्णन, एक नाटक,दहा शाहीर गीते, 15 वगनाट्य, तमाशे, एक छक्कड, आणि 100 पेक्षा अधिक गीते, एवढे मोठे साहित्य अण्णाभाऊंनी लिहिले त्यांच्या काही कथांच्या आधारे चित्रपट निर्मिती झाली.फकीरा,वारणेचा वाघ, साताऱ्याची तरा ( अलगुज), डोंगरची मैना (माकडीचा माळ), मुरली मल्हारी (चिखलातील कमळ ), बारा गावचे पाणी( वैजंता) टिळा लावते मी रक्ताचा (आवडी), हे त्या काळात गाजलेले चित्रपट होते.अण्णाभाऊंचे साहित्य अनेक भाषेत भाषांतरित करण्यात आले. आशा या पुरोगामी महाराष्ट्राची शान असणाऱ्या महान साहित्यिकास शंभराव्या जयंतीनिमित्त,जन्म शताब्दी निमित्त पुरोगामी महाराष्ट्राच्या वतीने विनम्र अभिवादन..
……. संपादक पुरोगामी महाराष्ट्र न्यूज -प्रमोद ज्ञानदेव शिंदे,9975903040.


