जवळा नि येथे साहित्यरत्न आण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी
जवळा नि येथे साहित्यरत्न आण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी
कोविड १९ च्या संकटामुळे जल्लोषात साजरी केली जाणारी जयंती साधेपणाने साजरी
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -(जवळा नि / सिरसाव : प्रतिनिधी)-
परांडा तालुक्यातील जवळा नि येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान जवळा नि यांचे वतीने कोविड १९ चे नियम पाळुन साजरी करण्यात आली
जयंतीची सुरुवात साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे प्रतिमेस पुष्पहार घालुन पुष्प अर्पन करुन प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आली,
संपुर्ण जगासमोर कोरोना विषानुचे संकट उभे आहे म्हणुन शासनाने सद्या जमावबंदी आदेश लागु केलेले आहेत कोणतेही कार्यक्रम मोठेपणाने साजरे करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे त्यामुळे शासनाने दिलेल्या सुचनांचे काठेकोरपणे पालन करुन जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. म्हणुन जास्त लोकांना एकञ न जमा करता मोठ्या जल्लोषात साजरी होणारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साध्याच पध्दतीने साजरी करण्यात आली.
या जयंती कार्यक्रमासाठी सरपंच नवजीवन चौधरी, ग्रामसेवक पोपट खटकाळे, एन. डी. एम. जे. संघटना जिल्हाध्यक्ष अजिनाथ राऊत तसेच साहित्यसम्राट प्रतिष्ठानचे मार्गदर्शक श्रीराम चव्हाण यांचेसह पत्रकार गणेश गवारे, कैलास चव्हाण, प्रभाकर चव्हाण सर, शाम चव्हाण, राजेंद्र चव्हाण, राजाभाऊ चव्हाण, हनुमंत पांगरे, सुनिल चव्हाण, आदिंसह गावातील सर्व जाती धर्मातील तरुण उपस्थित होते