खुडूस येथे साहित्यरत्न लोकशाहीर डाॅ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्सवात साजरी
खुडूस येथे साहित्यरत्न लोकशाहीर डाॅ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्सवात साजरी
खुडूस प्रतिनिधी – मकरंद साठे
खुडूस येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती जन्मशताब्दीनिमित्त पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी युवा क्रांती सेना सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मकरंद साठे, ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब साठे,युवा क्रांती सेना संघटनेचे तालुकाध्यक्ष दिपक पवार, ए.बी.प्रतिष्ठाणचे महादेव लोखंडे, पांडुरंग साठे, दादासाहेब साठे, चंद्रकांत साठे, छगन लोखंडे, राम कांबळे, बंडू कांबळे,धनाजी साठे,पोपट साठे,स्वाभिमानी होलार समाज संघटनेचे अश्वसेन गोरवे,शंकर सकट,अंकुश शिंदे रोहित साठे,माऊली साठे,वैभव गायकवाड,भागवत साठे,सचिन कांबळे,सुशांत गायकवाड कार्यकर्ते उपस्थित होते. साहित्यरत्न लोकशाहीर डाॅ.अण्णाभाऊ साठे यांच्या समग्र साहित्याचा माणुस हा केंद्रबिंदू आहे.माणसाचे,माणुस असणारे मुल्य आणि त्याची मानवी प्रतिष्ठा,जगण्यासाठी धडपडणाऱ्यांची निष्ठा यासाठी अण्णाभाऊ साठे लिहित व गात राहिले. सर्वसामान्य माणसाला नायक,नायिका बनविणारे अण्णाभाऊ साठे मराठीतील महत्त्वाचे साहित्यिक आहेत कृष्णा-कोयना नद्यांच्या खोऱ्यातील म्हणजेच सातारा, सांगली, कोल्हापूर परिसरातील लोकपरंपरा, लोकरूढी,गावगाढा, स्वातंत्र्य चळवळ त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्र चळवळ अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून सातासमुद्रापलीकडे पोहचवली. या सर्व कर्मठ आणि कट्टर पणाला विरोध करून न्याय, समता, बंधुता स्वातंत्र्य, बंधुभावाची रूजवणुक अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून केली. अशा या महामानवाच्या 100 व्या जन्मशताब्दीनिमित्त व जयंतीनिमित्त सर्वांनी त्यांच्या कार्याचे चरित्राचे, त्यांच्या विचारांचे स्मरण करून त्यांचे प्रती आदर व्यक्त करून व शासनाच्या नियमांचे पालन करून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सोशल डिसटन्स ठेवून डाॅ.अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पांडुरंग साठे,योगेश साठे,सुशांत गायकवाड, माऊली साठे,केशव गोरवे आदींनी परिश्रम घेतले.