पत्रकार सुनील राऊत यांनी दीक्षित गुरुकुलला 25 हजार देणगी देऊन मुलीचा विवाह सोहळा केला साजरा

सुनील राऊत यांनी दीक्षित गुरुकुलला 25 हजार देणगी देऊन विवाह सोहळा केला साजरा

पुरोगामी महाराष्ट्र नवीन नेटवर्क -नातेपुते येथील ज्येष्ठ पत्रकार व शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक सुनील राऊत यांनी आपली कन्या केतकी हिच्या विवाह प्रसंगी महाराष्ट्र बंधू राजीव दीक्षित गुरुकुलला पंचवीस हजार रुपये देणगी देऊन सामाजिक भान राखत वेगळ्या पद्धतीने विवाह सोहळा साजरा केला.
पत्रकार सुनील राऊत यांची कन्या केतकी व कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांचे चिरंजीव निखील यांचा शुभविवाह कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स व इतर नियमांचे पालन करत पार पडला.
यावेळी युवकमित्र ह.भ.प.बंडातात्या कराडकर, श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज देवस्थान त्र्यंबकेश्वरचे अध्यक्ष ह.भ.प.संजय महाराज धोंडगे, माजी आमदार रामहरी रुपनवर,श्रीमती पद्मजादेवी मोहिते-पाटील, माजी आमदार योगेश टिळेकर,उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील,बाबाराजे देशमुख, डॉ. एम. पी.मोरे, धैर्यशील देशमुख, सरपंच ॲड. बी.वाय. राऊत,ॲड.डी.एन.काळे, सोपानराव नारनवर व इतर मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत भिसे, चंद्रकांत कुंभार, मिलिंद गिरमे, व्यसनमुक्त युवक संघाचे प्रदेश सचिव विवेक राउत यांनी केले.

चि. सौ. केतकी व चरंजिवं निखिल