समीर नवगिरेंवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करा….रामदास आठवले सामाजिक न्याय राज्य मंत्री

समीर नवगिरेंवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करा….रामदास आठवले सामाजिक न्याय राज्य मंत्री

मिरे एट्रोसिटी प्रकरणातील आरोपींवर मोक्का कायदा लावून स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करण्याचा अहवाल विशेष न्यायालयात पाठवावा….रामदास आठवले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना निर्देश

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मिरे ता.माळशिरस जि. सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते समीर अरुण नवगिरे व सुदीप बाळकृष्ण नष्टे यांच्यावर दिनांक 1 जुन 2020 रोजी एट्रॉसिटी दाखल केल्याचा राग मनात धरून प्राणघातक हल्ला झाला होता.सुदीप नष्टे यांच्या फिर्यादीवरून राजू गुंड याच्यासह 11 आरोपींवर अकलूज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा.रजी.नं.256/2020 भा.द.वी.307 व एट्रोसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल झाल्याने पोलीस अधीक्षक मा.मनोज पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना स्थानीक पोलीस प्रशासनास दिल्या होत्या
उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज मा.नीरज राजगुरू यांनी अतिशय सखोल गुणवत्तेच्या आधारावर तपास करून दिनांक 24 जुलै 2020 रोजी आरोपपत्र भा.द.वी.120 (ब),143,147,148,149,307,323,326,329,341,395,504,506अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा सुधारणा 2015 कलम 3(1)आर,एस,वाय,यु,3(2)व्ही ए,3(2)व्ही नुसार मे.विशेष न्यायालय माळशिरस येथे दाखल केले आहे.तपासात आरोपींनी कट करून संगनमताने समीर नवगिरे व सुदीप नष्टे यांच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याचे निष्पन्न झाले आहे.या गुन्ह्यातील दोन आरोपी विजय गुंड व बबलू गुंड हे अद्याप फरार आहेत.नऊ आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.आरोपी हे वाळू तस्कर असल्याने विविध पोलीसस्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.घटना घडल्यापासूनच आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते मा.विकास दादा धाइंजे व नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव यांनी पीडितांना मदत केली आहे.वैभव गिते यांनी मा.रामदासजी आठवले सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार यांची भेट घेऊन निवेदन देऊन चर्चा केली.
रामदासजी आठवले यांनी या गुन्ह्यातील आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करून यांची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करण्याचा अहवाल मे.विशेष न्यायालयात दाखल करवा तसेच फिर्यादी व साक्षीदार यांच्यावर पुन्हा हल्ला होऊ नये म्हणून एट्रोसिटीचे खटले संपेपर्यंत मिरे या गावात पोलीस संरक्षण ठेवावे असे निर्देश विशेष पोलीस महानिरीक्षक कैसर खालिद,सोलापुर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दिले आहेत.