एम पि एस सी च्या आॅनलाईन परिक्षेला एन डी एम जे चा विरोध
एम पि एस सी च्या आॅनलाईन परिक्षेला एन डी एम जे चा विरोध
उच्च न्यायालयाच्या प्रबंधकाकाकडे एन डि एम जे ची आॅफलाइन परिक्षेची मागनी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क हिंगोली (मोहन दीपक)-सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) त्याच्या मार्फत घेन्यात येनार्या सर्व परिक्षा आॅनलाईन पद्धतिने घेन्याचे ठरवले आहे…
आॅनलाईन परिक्षापद्धत मोठ्या प्रमानात धोक्याची असुन त्यामध्ये फ्राॅड होन्याची दाड शक्यता आसल्याने व एखांद्या कंपनिला टेंडर देउन त्यांच्या मार्फत परिक्षा घेने घटनाबाह्य आसुन या आॅनलाईन पद्धतीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होन्याची शक्यता आसल्याने या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेन्यात येनार्या आँनलाईन परिक्षापद्धतिच्या विरोधात आम्ही असुन या पद्धतिचा आम्ही नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टिस च्या वतिने जाहिर निषेध करतो अशी माहिती नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टिस चे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष जगदिप वसंतराव दिपके यांनी म्हनटले आहे… व या संदर्भात मुंबई उच्चन्यायालयाच्या प्रबंधकांना निवेदन दिले आहे सदर निवेदनामध्ये आॅनलाईन परिक्षा पद्धत व्हेरिफायबल नाही यामध्ये झालेला फ्राॅड पडताळुन पाहता येत नाही…
आॅफ लाईन ला सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका शेफ राहतात आनी विषेश म्हनचे ह्या सर्व उत्तरपत्रीका सि सि टि व्ही कॅमेर्याच्या कक्षेत राहतात… आनी आर टि आय मध्ये विद्यार्थ्याला कोनाचिही उत्तरपत्रिका सहज मिळु शकते… त्याच बरोबर आँनलाईन परिक्षा घेत आसतांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग एखांद्या कंपनीला परिक्षा घेन्याचे टेंडर देनार व ज्या कंपनिने टेंडर घेतले ती कंपनी परिक्षेच सर्व कामकाज पाहनार मुळात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची निर्मीतिच परिक्षा घेन्यासाठी झालेली असुन परिक्षा घेने हे आयोगाचे मुलभुत काम आहे ज्या कामासाठी आयोगाची निर्मिती घटनेने केली आहे तेच मुख्य काम आयोग झुगारुन लावतोय, आनी ज्या कंपनीला काॅन्ट्रक्ट दिलाय ती कंपनी फ्राड करनार नाही याची जबाबदारी कोन घेनार आॅनलाईन परिक्षेमध्ये विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका सर्वरवरच डायरेक्ट बदलता येते व बदललेली उत्तर पत्रिका कशी कळणार त्याच बरोबर आँनलाईन परिक्षेमध्ये एका विद्यार्थ्याला फक्त त्याचीच उत्तरपत्रिका मिळते ईत्तर विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका मिळनार नाही आनी आॅफलाईन परिक्षे मध्ये कोनत्याही विद्यार्थ्याला कोणत्याही विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका आर टी आय मध्ये मिळते म्हनजेच इथे right to information चे देखिल आयोग हानन करित आहे, आॅफलाईन परिक्षे मध्ये उत्तर पत्रिका बदलता येत नाही त्या सुरक्षित असतात, त्यांच्यावर पर्वेक्षक व विद्यार्थ्यांच्या स्वक्षर्या असतात शिवाय सर्व उत्तरपत्रिका सि.सि.टि.व्ही. कॅमेर्याच्या कक्षेत असतात म्हणून त्या मध्ये फ्राॅड करने खुप अवघड आसते,
तसेच आयोगाने तिनलाख प्रश्र्नांची कोष्शन बॅक तयार करून ति सिस्टीमवर राहील व ती ईनक्रिप्टेड आसेल परंतु ज्या यंत्रनेकडे त्या कोष्शन बॅक ची सेक्युरीटी आहे त्यांनिच फ्राॅड केला तर म्हनुन प्रत्यक परिक्षेच्या वेळस १०० प्रश्न काढुन ते सुरक्षित ठेवन सोपं की तीनलाख प्रश्न सांभाळुन ठेवनं सोप्प आहे, या सर्व बाबी संशस्पद आसुन गोरगरिब होतकरू विद्यार्थ्यांसाठी घातक ठरू शकतात म्हनुन महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेन्यात येनार्या परिक्षा आॅफलाईन घेन्यात याव्यात व जर आयोग आॅनलाईन परिक्षा घेन्यावरच अवलंबुन आसेल तर ती परिक्षा घेत आसतांना व्हि व्हि पॅड प्रनालीची वेवस्था करावी अशी मागणी नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या वतीने मुंबई उच्चन्यायालयाचे महाप्रबंधक, व राज्यपाल व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे तहसिलदार औंढा नागनाथ यांच्या मार्फत निवेदनाद्वारे केली आहे सदरिल निवेदनावर नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टिस चे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष जगदिप वसंतराव दिपके जिल्हाध्यक्ष मोहन मदन दिपके प्रसिद्धी प्रमुख उग्रसेन भिवसेन नवले युवा जिल्हाध्यक्ष पवनकुमार चंद्रभान ठोके कचरू बळिराम चव्हान ईत्यादी पदाधिकार्याच्या स्वाक्षर्या आहेत….