वंचित बहुजन आघाडी माळशिरस तालुक्याच्या वतीने बसेस सुरू करण्यासाठी अकलूज बस डेपो याठिकाणी डफली बजाओ आंदोलन
वंचित बहुजन आघाडी माळशिरस तालुक्याच्या वतीने बसेस सुरू करण्यासाठी अकलूज बस डेपो याठिकाणी डफली बजाओ आंदोलन
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे (अकलूज) वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार राज्यातील सर्व बससेवा सुरू करून जनतेचे जीवन पुर्वरत पद्धतीने सुरळीत करावे यासाठी वंचित बहुजन आघाडी माळशिरस तालुक्याच्या वतीने अकलूज बस डेपोसमोर डफली बजाओ आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार ८०% लोकांमध्ये कोरोनाविरुद्धच्या अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत, १५% लोकांमध्ये त्या तयार होतायेत. त्यामुळे सरकारने उर्वरित ५% लोकांना शोधून त्यांची काळजी घ्यावी परंतु त्यासाठी ९५% लोकांना वेठीस धरू नये. लॉकडाऊनमुळे लोकांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे, सर्वसामान्यांचे रोजगार बंद पडल्यामुळे जगण्याचा प्रश्न गंभीर होऊन बसला आहे अशावेळी जनतेला कोरोनापेक्षा पोटाच्या प्रश्नाची अधिक चिंता आहे.
सदर आंदोलन हे जनतेसाठी असुन सर्वसामान्यांचे रोजगार व दैनंदिन जीवन सुरू झाले पाहिजेत. प्रशासनाने यावर गांभीर्याने विचार करून सार्वजनिक वाहतूक सुरू करून जनतेचे जीवन सुरळीत करावे असे मत वंचितचे माळशिरस विधानसभेचे उमेदवार राज कुमार यांनी व्यक्त केले. परिवहन सेवा म्हणजे लालपरी ही सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा घटक असुन लॉकडाऊनच्या काळातही याच लालपरीने संतांची पालखी पंढरपूरला आणली होती त्यामुळे लवकरात लवकर परिवहन सेवा सुरू करून लॉकडाऊन संपवावा अन्यथा आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू असा ईशारा वंचितचे तालुकाध्यक्ष अभिजीत गायकवाड यांनी दिला. या आंदोलनामुळे सरकारचे डोके ठिकाणावर येईल त्यासाठी डफली जोरात वाजवून आम्ही सरकारला जागे करत असल्याचे मत विजय बनसोडे यांनी व्यक्त केले. सरकारने याची दखल त्वरित न घेतल्यास पुढील आंदोलन अजुन तिव्र करण्यात येईल अशी भावना संदीप घाडगे यांनी व्यक्त केली. आंदोलनाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते सुनील ओव्हाळ यांनी करून आंदोलनाची रूपरेखा स्पष्ट केली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे माळशिरस विधानसभेचे उमेदवार राज कुमार, माळशिरस तालुकाध्यक्ष अभिजीत गायकवाड, गोपाळ घार्गे-देशमुख, विजय बनसोडे, माळीनगरचे सरपंच अभिमान जगताप, संदीप घाडगे, चंदनशिवे सर, सुनील ओव्हाळ, ऍड.भोसले, प्रदीप झेंडे, आकाश जगताप, जितेंद्र साळवे, सुरज वाघंबरे, सागर जगताप, प्रकाश दनाने, बाळासाहेब गायकवाड, मिलन धाइंजे, बंटी चंदनशिवे, अमोल भोसले, सुरज लोंढे, साबळे, गायकवाड यांच्यासह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.