अवैद्य मुरूम उत्खनन करणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याची- युवा सेना जिल्हाप्रमुख स्वप्निल वाघमारे यांची मागणी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
/:-मौजे-खळवे,ता.माळशिरस या गावच्या हद्दीत श्री एम.एस.आवताडे प्रा.लि.या कंस्ट्रक्शन कंपनी,मंगळवेढा यांनी शासनाची कोणतीही परवानगी नसताना अवैध मुरूम उत्खनन व वाहतुक केल्यामुळे कंपनीवरती दंडात्मक कारवाईची मागणी युवासेना जिल्हाप्रमुख स्वप्निल भैय्या वाघमारे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
खळवे येथील गट नं.151,120/1,152,154 याव्यतिरिक्त इतर गटांमध्ये आवताडे कंस्ट्रक्शन कंपनीने आठ महिन्यांपासून विनापरवाना,अनधिकृत गौणखनिज मुरूम उत्खनन व वाहतुक केली आहे.
सदर मुरूम हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सन 2019-20 अंतर्गत पॅकेज क्र.सोलापूर 106,माळखांबी-खळवे-पिराची कुरोली-पंढरपुर या संत तुकाराम महाराज पालखी मार्गासाठी वापरलेला आहे.या कामासाठी लागणारा मुरूम उत्खनन करण्यासाठी कंपनीने महसुली प्रसिद्धी
शासनाची कोणतीही परवानगी किंवा राॅयल्टी भरली नाही.यामुळे कंपनीने शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडविला आहे.
गांव कामगार तलाठी सजा-खळवे /माळखांबी यांनी मा.तहसीलदार माळशिरस यांचेकडे मुरूम उत्खनन व वाहतुकीबाबत जमा.संकलन आवक क्र.4083 हा दि.15जुलै2020 रोजी पंचनामा सादर केला होता.परंतु सदर पंचनाम्यामध्ये पंचांची नावे व स्वाक्ष-या नसल्याने तो मोघम स्वरूपाचा असल्याचे तत्कालीन तहसीलदार अभिजित पाटील यांनी तलाठी यांना उलटपक्षी पत्राद्वारे कळवले होते.
तसेच दि.12 आक्टोंबर 2020 रोजी सदर पंचनाम्यामध्ये त्रुटी असुन नव्याने फेरपंचनामे करून परिपूर्ण पंचनामे सादर करण्याचे पत्र मा.प्रांताधिकारी अकलूज व मा.तहसीलदार माळशिरस यांनी मंडल अधिकारी-महाळुंग व तलाठी यांना काढले आहे.तरीही.तलाठी दिपक साठे व लिपिक अशोक शिंदे हे फेरपंचनामे करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करून विलंब करीत असल्याचा आक्षेप युवासेना जिल्हाप्रमुख स्वप्निल भैय्या वाघमारे यांनी घेतला आहे.
महाराष्ट्र जमिन महसुली अधिनियमानुसार अनधिकृत गौणखनिज उत्खनन केल्यामुळे उत्खनन केलेल्या मुरूमाच्या पाचपट दंडाची रक्कम आकारून शासनाचा बुडविलेला महसुल वसुल करावा.माजी तहसीलदार पाटील यांनी अहवालात नमुद केल्याप्रमाणे तलाठी आवताडे कंस्ट्रक्शन कंपनीला पाठीशी घालत असल्याचे निदर्शनास आल्याने तसेच तहसीलदार निंबाळकर यांनी फेरपंचनामा करण्याचे फेरआदेश दिले असतानाही तलाठी पंचनामा करण्यास टाळाटाळ करीत जाणीवपूर्वक विलंब करीत असल्याने तलाठी यांचेवरती निलंबनाची कारवाई करावी अन्यथा दि.09 नोव्हेंबर 2020 रोजी तहसिल कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा स्वप्निल वाघमारे यांनी दिला आहे.
“एस.एम.आवताडे कंपनीने या प्रकरणात शासनाची शुद्ध फसवणूक करून कोट्यावधी रूपयांचा महसुल बुडविल्याचे प्रशासनासमोर आणुन दिले आहे.हे प्रशासनाने मान्यही केले आहे. परंतु फेरपंचनाम्याचे आदेश असुनही दंडात्मक कारवाई करण्यास तलाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत.फक्त कागदी घोडे नाचवुन लालफितीचा कारभार केला जात आहे.याचा सरळ अर्थ असा होतो की,आवताडे कंन्सट्र्कशन कंपनीचे व महसुल प्रशानाचे आर्थिक लागेबंध असु शकतात.” असे आरोप
-मा.स्वप्निलभैय्य वाघमारे,
युवासेना जिल्हाप्रमुख तथा पं.स.सदस्य,माळशिरस यांनी केले आहेत.