चोरीस गेलेले २१ मोबाईल कर्नाटकातून हस्तगत.पंढरपूर शहर पोलिसांची कामगिरी .

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पंढरपूर/ प्रतिनिधी

पंढरपूर येथे मध्यवर्ती ठिकाणाहून दसऱ्याच्या सणासाठी फुल खरेदी करताना गर्दीचा फायदा घेऊन चोरीस गेलेला मोबाईल पंढरपूर पोलिसांना तपासादरम्यान सापडला कर्नाटक राज्यातील एका जिल्ह्यात आणि चौकशीदरम्यान मिळाले २ लाख १७ हजार किमतीचे एकूण २१ मोबाईल. पंढरपूर पोलिसांची कामगिरी.

पंढरपूर येथे दसऱ्याच्या सणासाठी १० ऑक्टोबर २०१९ रोजी फुल खरेदीसाठी गेले आसता गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी झाल्याची तक्रार पंढरपूर शहर पोलीसात येथील  ओंकार सतीश कळसकर यांनी दिली होती. याबाबत पंढरपूर पोलिसांकडून तपास सुरू होता. सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला मोबाईल हा कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यात नेटवर्क दाखवत असल्याचे सायबर पोलीस ठाण्याकडून माहिती मिळाल्यानंतर पंढरपूर शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व टिमकडून  कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यात जाऊन तपास केला असता. फिर्यादीचा मोबाईल विधी संघर्षग्रस्त बालकाकडे मिळून आला. सदर मोबाईल जप्त करून विधिसंघर्षग्रस्त बालकाकडे अधिक चौकशी केली असता. कर्नाटक राज्यातील शिमोगा व हवेली जिल्ह्यातून २ लाख १७ हजार किमतीचे एकूण २१ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे.

हि कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस अधिकारी अरुण पवार यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक आर.जे गाडेकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल-शरद कदम, बिपिन ढेरे, सुरज हेंबाडे, राजेश गोसावी, पोलिस नाईक-गणेश पवार, इरफान शेख, शोएब पठाण,पोलिस कॉन्स्टेबल-सिध्दनाथ मोरे, सुजित जाधव, संजय गुटाळ, समाधान माने, सुनील बनसोडे, अन्वर आतार तसेच सायबर पोलिसांच्या साह्याने सदरची कामगिरी केली आहे.

पंढरपूर शहर पोलिसांची कामगिरी .

You may have missed