नातेपुते ग्रामपंचायत सरपंच पदी कांचन लांडगे तर उपसरपंच पदी अतुल पाटील यांची निवड
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते प्रतिनिधी.-नातेपुते ग्रामपंचायत मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत देशमुख पाटील कवितके उराडे ठोंबरे भांड या गटाचे व जनशक्ती विकास आघाडीचे उमेदवार सौ कांचन दादा लांडगे या सरपंच पदी व उपसरपंच पदी अतुल राजेंद्र पाटील त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली
माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील महत्वाची चुरशीची व प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या नातेपुते ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जनशक्ती विकास आघाडी पॅनल विरुद्ध नातेपुते नागरी संघटना पॅनल ची समोरासमोर दुरंगी लढत लागली होती यामध्ये जनशक्ती विकास आघाडी पॅनलचे सात उमेदवार ( वार्ड क्रमांक १ ) मधील सनम सिकंदर मुलानी व सोनल गणेश उराडे (वार्ड क्रमांक ४ ) मधून रंजना मारुती पांढरे व विद्या सोमनाथ सावंत (वार्ड क्रमांक ५ ) मधून अनुराधा भारत उराडे, संदीप चंद्रकांत ठोंबरे, अजय चंद्रशेखर भांड हे बिनविरोध निवडून आले होते. त्यापैकी दहा जागांसाठी २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात निवडणूक लढविण्यासाठी समोरासमोर उभा होते जनशक्ती विकास आघाडी पॅनलचे ७ उमेदवार बिनविरोध व उर्वरित निवडणुकीच्या रिंगणात उभा केलेले १० उमेदवार यामध्ये (वार्ड क्रमांक १ ) मध्ये रणवीर अमरसिंह देशमुख, (वार्ड क्रमांक २ ) मध्ये सुखदेव सदाशिव ननवरे ,कांचन दादा लांडगे भारती बापूराव पांढरे (वार्ड क्रमांक 3 ) मध्ये प्रकाश बबन साळवे, अतुल राजेंद्र पाटील (वार्ड क्रमांक ४ ) मध्ये डॉ. नरेंद्र रघुनाथ कवितके (वार्ड क्रमांक ६ ) मध्ये उत्तम गल्लू बरडकर ,स्वाती अतुल बावकर, शितल गणेश बरडकर हे उमेदवार निवडणुकीमध्ये भरघोस मताधिक्याने निवडून आले त्यामुळे यावेळेस जनशक्ती विकास आघाडीचे सरपंच होणार हे नक्की होते व शासकीय आरक्षणानुसार यावेळी सरपंच पदी सौ कांचन दादा लांडगे व उपसरपंच पदी अतुल राजेंद्र पाटील यांची निवड करण्यात आली या निवडीबद्दल जनशक्ती विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नातेपुते दहिगाव चौकात ग्रामपंचायत पटांगणामध्ये फटाकडे उडवून जल्लोष साजरा केला