नातेपुते पोलीस स्टेशन येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

नातेपुते पोलीस स्टेशन येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते -प्रमोद शिंदे
नातेपुते पोलीस स्टेशन येथे 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त नातेपुते पोलीस स्टेशन व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात महिलांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नातेपुते ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टर नम्रता होरा,महिला बालकल्याण संरक्षण अध्यक्ष वावरे मॅडम तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नातेपुते ग्रामपंचायत नूतन सरपंच कांचन लांडगे या होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक एपी.आय मनोज सोनवलकर यांनी केले प्रास्ताविकात ते म्हणाले की महिलांना सर्व क्षेत्रात समान संधी मिळाली पाहिजे महिला दिन हा एका दिवसापुरता साजरा न करता नेहमीच महिलांचा सन्मान झाला पाहिजे.महिला या शक्तीपीठ आहेत.
तसेच डॉक्टर नम्रता होरा यांनी महिलांना आरोग्य विषयक माहिती दिली तर महिला बालकल्याण संरक्षण अध्यक्षा वावरे मॅडम यांनी महिलांसाठी कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायदा त्यामध्ये लैंगिक हिंसाचार व अनेक हिंसाचाराचे प्रकार सांगितले. सरपंच कांचन लांडगे म्हणाल्या की मुलींना लाडाने परी बनवू नका तर वाघीण बनवा असा संदेश त्यांनी दिला.महिला आर्थिक विकास महामंडळ शेंडगे साहेब यांनी सुद्धा महिलांना मार्गदर्शन केले.तसेच पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल च्या वतीने संपादक प्रमोद शिंदे व प्रशांत खरात यांच्या वतीने कोरोना काळात उल्लेखनीय काम केलेल्या महिला कर्मचारी डॉक्टर नम्रता होरा, महिला पोलीस कॉन्स्टेबल सोनाली पवार, नेहा बोंदर,सामाजिक कार्यकर्त्या जयश्री अटक यांचा कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला .या कार्यक्रमास रिपाईचे नेते एन के साळवे,दयानंद धाईंजे,पत्रकार लतीफ भाई नदाफ,अभिमन्यू आठवले,आनंद लोंढे,विलास भोसले,आनंद जाधव,भगत महाराज तसेच ग्रामपंचायत सदस्य महिला पोलीस पाटील, बचत गटातील महिला, महिला सामाजिक कार्यकर्त्या उपस्थित होत्या. हा कार्यक्रमात मास्क व सॅनिटायझर चे वाटप करून सोशल डिस्टंसिंग मध्ये पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर सोरटे यांनी केले तर आभार कार्यक्रमाचे आयोजक रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र सचिव एन.के साळवे यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल बबलू गाडे व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

You may have missed