ग्रामपंचायत 15 टक्के निधीतून अनुसूचित जाती जमाती च्या लोकांना धान्य वाटप करा-विकास दादा धाईंजे

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
( प्रमोद शिंदे) –

ग्रामपंचायत 15 टक्के निधीतून अनुसूचित जाती जमाती च्या लोकांना धान्य वाटप करा यासाठी निवेदन देताना आंबेडकरी चळवळीचे नेते विकास धाईंजे, प्रमोद शिंदे, सुनील भोसले 

पुन्हा एकदा महाराष्ट्रात कोरोना ने परत थैमान घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळे शासनाने लोकांवर कडक निर्बंध टाकण्यास सुरुवात केली आहे.काही ठिकाणी लॉकडाऊन सुरू केला आहे. व्यवसायामध्ये मंदी आली आहे.महागाईचा भडका वाढत आहे.त्यामुळे लोकांच्या हाथाला काम नाही. त्यामुळे अनुसूचित जाती जमाती च्या पंधरा टक्के निधीतून अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना जीवनावश्यक वस्तू वाटप करा अशी मागणी गटविकास अधिकारी माळशिरस यांच्याकडे माळशिरस येथील माजी सरपंच तथा आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते विकास दादा धाईंजे यांनी केली आहे.माळशिरस तालुक्यातील 108 ग्रामपंचायती आहेत या सर्व  ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक यांना आदेश देऊन 15 % अनुसूचित जाती जमाती लोकांच्या विकासाच्या निधीतून लोकांना अन्न धान्य वाटप करण्या साठी खर्च करण्यात यावा असे आदेश तात्काळ देण्यात यावे.यासाठी आंबेङकरी चळवळीच्या वतीने पंचायत समिती च्या गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले त्या निवेदनावर ती आंबेडकर चळवळीचे नेतेविकासदादा धाईंजे, रिपाईचे जेष्ठ नेते दयानंद धाईंजे, प्रदीप धाईंजे यांच्या सह्या आहेत. निवेदन देताना पत्रकार प्रमोद शिंदे (एन डी एम जे राज्य प्रसिद्धीप्रमुख) व एन डी एम जे तालुका संघटक सुनील भोसले उपस्थित होते.

You may have missed