माळशिरस नगरपंचायतीमध्ये बेकायदेशिर कर्मचारी भरतीच्या निषेधार्थ पुणे येथे आमरण उपोषण
माळशिरस नगरपंचायतीमध्ये बेकायदेशिर कर्मचारी भरतीच्या निषेधार्थ पुणे येथे आमरण उपोषण,
माळशिरस( प्रमोद शिंदे) 2015 मध्ये माळशिरस येथे ग्रामपंचायत बरखास्त होऊन नगरपंचायत अस्तित्वात आली यावेळी या ठिकाणी कार्यरत असणारे अनेक कर्मचारी आकृतीबंध नुसार कमी करण्यात आले,याचा फायदा घेत तत्कालीन ग्रामसेवक, तत्कालीन मुख्याधिकारी व भरती प्रक्रियेशी निगडीत सर्व अधिकाऱ्यांनी आर्थिक व्यवहार करून मुळ पात्रताधारकांना बाजूला करून त्यांचे ठिकाणी इतर लोकांना कामाला लावले आहे ही संपूर्ण भरती प्रक्रिया बेकायदेशीर व अनाधिकृत आहे .सध्या हे लोक नगरपंचायत मध्ये स्वतःचा एकाधिकारशाही नुसार कार्यभार सांभाळत आहेत माळशिरस या नगरपंचायती मध्ये आपले काम घेऊन येणाऱ्या लोकांना व्यवस्थित बोलत नाही त्यांची कामे वेळेत करत नाही त्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश थोरात यांनी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये संबंधित विभागाकडून या कर्मचारी भरती ची संपूर्ण माहिती मागवली असता त्यामध्ये त्यांना तफावत दिसून आली त्यानुसार त्यांनी अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा व ही बेकायदेशीर झालेल्या कर्मचारी -अधिकारी नियुक्तीची चौकशी करून शासनाच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्या दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी वेळोवेळी मा.मुख्याधिकारी नगर पंचायत माळशिरस सोलापुर येथील वरिष्ठ म्हणजेच मा.जिल्हा प्रशासन अधिकारी यांच्याकडे वेळो-वेळी कागदोपत्री पाठपुरावा केला मात्र , तक्रारदारांचे पदरी निराशाच पडली. संबंधित अधिकारी या प्रकरणी मौन बाळगून होते , त्यांनी संबंधितांवर कारवाई केली नाही उलट याप्रकरणी अधिकारी जाणीवपुर्वक उदासीनता दाखवित असून त्या ठिकाणी सुध्दा,आर्थिक व्यवहार झाले असल्याचे मंगेश थोरात यांचे म्हणणे आहे .त्यानुसार यापुढे मा.विभागीय आयुक्त सो,(महसुल)पुणे यांचे यांचे कार्यालयात सुद्धा या संदर्भात तक्रार अर्ज दाखल केला, मात्र ,अद्यापि त्या ठिकाणी ही कोणतीच कार्यवाही, कारवाई झालेली दिसून आलेली नाही , त्यामुळे या सर्व भ्रष्ट प्रशासनाच्या निषेधार्थ मा.विभागीय आयुक्त सो (महसूल) पुणे,विधानभवन, यांचे कार्यालयासमोर दि. १ ऑक्टोबर २०१९ रोजी, सकाळी ९ वाजता आमरण उपोषणास बसणार आहे अशी माहिती मंगेश थोरात यांनी दिली,यावेळी सामाजिक कार्यकर्ता सुनील ओवाळ, आदी उपस्थित होते.