* रि.पा.ई कार्यकर्त्याची निष्ठा श्रेष्ठींकडून राजकारण्यांच्या दावणीला कार्यकर्त्यांच्या हाती गाजर*
रि.पा.ई कार्यकर्त्याची निष्ठा श्रेष्ठींकडून राजकारण्यांच्या दावणीला कार्यकर्त्यांच्या हाती गाजर*
नातेपुते(प्रमोद शिंदे )माळशिरस विधानसभा जागेवर रिपाई क्षातील कोणत्याही पदाधीका-याला विश्वासात न घेता रिपाई च्या नावाखाली भाजपा चा उमेदवार देण्यात आला ल्यामुळे रि.पा.ई मध्ये प्रचंड नाराजी तयार झाली आहे. अतिशय शिस्तबद्ध व प्रामाणिक पने महायुतीचे काम करत असताना सुध्दा भाजपा कडून जर रिपाईचा असा अपमान होणार असेल रिपाईचा कार्यकर्ता महा युतीसोबत काम करण्यास विचार करेल महायुतीने माळशिरस ची आरपीआय ला जागा सोडून चेष्टा केल्यासारखं झाला आहे. आठवले साहेबांनी सुद्धा ही जागा रिपेअर सुटल्याचा पत्रकार परिषद घेऊन सांगितले त्या पत्रकार परिषदेत उमेदवारीबाबत मोहिते पाटील निर्णय घेतील असं सांगितले त्यामुळे रिपाईच्या कार्यकर्त्यांची निष्ठा ही पक्षश्रेष्ठींकडून राजकारण्याच्या दावणीला बांधल्यासारखे झाली. आरपीआयला जागा सोडून उमेदवार मात्र भाजपचा दिला असल्याने आरपीआय कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत नाराजी असल्याचं तालुक्यात दिसत आहे माळशिरस तालुक्यात विधानसभा लढवण्यासाठी आरपीआयचे कार्यकर्ते सक्षम असताना भाजपचा उमेदवार मोहिते पाटलांनी देण्याचे ठरवल्याने मोहिते पाटलांच्या विरोधात रिपाईच्या कार्यकर्त्यांमध्ये रोश निर्माण झाला आहे. तसेच आरपीआयचे सर्वेसर्वा रामदास आठवले साहेब यांच्यावर सुद्धा कार्यकर्ते नाराज असल्याचं दिसून येत आहे.प्रामाणिकपणे व निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा रामदास आठवले यांनी विचार केला नसल्याचं बोलले जात आहे. इतर जिल्हा व तालुक्या पेक्षा माळशिरस तालुक्यामध्ये आरपीआय ची चळवळ व ताकत मोठ्या प्रमाणात असून कार्यकर्तेही आठवले साहेबांचे निष्ठावान आहेत. तरीसुद्धा ही जागा आरपीआयच्या कार्यकर्त्यांनान देता भाजप व आर.एस.एस च्या कार्यकर्त्याला दिल्यामुळे तालुक्यातील आरपीआयचे निष्ठावंत कार्यकर्त्यावर एक प्रकारचा अन्याय झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे येत्या काळात आरपीआयचे कार्यकर्ते कोणतं पाऊल उचलतात हे येणारा काळच सांगू शकेल उमेदवारीबाबत आरपीआयच्या कार्यकर्त्यांची चर्चा झाली असता अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून आली. त्यांच्यामध्ये आता संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. कार्यकर्त्यांच्या अवस्था अशी झाली आहे की “रामदासा कोणता झेंडा घेऊ हाती” याचं उत्तर रामदास आठवले यांनी देणे अपेक्षित आहे. कारण अहोरात्र काम करून आरपीआयचा बालेकिल्ला माळशिरस कार्यकर्त्यांनी मजबूत केला आहे. या बालेकिल्ल्यावर आयत्या वेळेला इतर राजकारण्यांनी अतिक्रमण केले असल्यामुळे येथील निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाले आहेत. यांची नाराजी रामदास आठवले कशाप्रकारे दूर करणार हे पाहणं गरजेचे आहे.