दहिगाव येथील युवकाने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा चिरून केला खून
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रमोद शिंदे ): दहिगाव तालुका माळशिरस येथील नोकरीनिमित्त पुण्यात गेलेल्या नितीन निकम या युवकाने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा चिरून खून केल्याची घटना शनिवारी हडपसर येथे घडली आहे.यासंदर्भात हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हकीकत अशी की,नितीन निकम आणि त्याची पत्नी अंजली नितीन निकम वय 22 हे दोघेही पुणे येथील चक्रपाणी वसाहत,भोसरी येथे सोबत राहत होते.नितीन हा भोसरी येथील खाजगी कंपनीत इलेक्ट्रिशियन चे करतो.त्याच्या लग्नाला 6 वर्ष झाले असून त्याचा पत्नी अंजलीच्या चारित्र्यावर संशय होता.वारंवार या कारणावरून दोघांमध्ये भांडणे होत असत.काही दिवसांपूर्वी याच कारणावरून भांडण झाले होते.म्हणून ते हडपसर येथील नातेवाईकांकडे गेले शनिवारी देखील त्या दोघांची भांडणे झाली त्यानंतर ते दोघे हडपसर वरून दहिगावकडे गाडीवरून जाण्यासाठी निघाले असता.रस्त्यामध्ये दोघांची भांडणे झाली रागाच्या भरात नितीन निकम ने पत्नी अंजली हिचा भररस्त्यात बंटर बर्नाड शाळेजवळ गळा चिरून खून केला. खून करून तो स्वतः हडपसर पोलीस स्टेशन येथे अटक होण्या साठी हजर झाला. ही घटना शनिवारी दिनांक 10जुलै रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली.

खून केल्यानंतर आरोपी नितीन हा देखील आत्महत्या करण्यासाठी निघाला होता.तत्पूर्वी त्याने भावाला फोन करून घडलेला प्रकार सांगितला आणि स्वतः आत्महत्या करणार असल्याचे सांगितले.मात्र भावाने त्याला मुलाचे कारण पुढे करून आत्महत्या करू नको असे सांगितले.या सर्व प्रकारानंतर आरोपी नितीन निकम स्वतः हडपसर पोलीस ठाण्यात हजर झाला. आरोपी नितीन विरोधात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे

हडपसर पोलिसांनी त्याला खुनाच्या आरोपात अटक केली आहे व न्यायालयात हजर केलेअसता त्याला तीन दिवसाची पोलिस कोठडी मिळाली असून या घटनेचा अधिक तपास हडपसर पोलीस स्टेशनच्या पीएसआय राजश्री पाटील मॅडम करीत आहे.
