श्रीनिवास कदम पाटील यांना अभिनेता अण्णा बनसोडे यांच्याकडून वाढदिवसानिमित्त 11 रुपयाच्या अनोख्या अर्थपूर्ण शुभेच्छा

श्रीनिवास कदम पाटील यांना अभिनेता अण्णा बनसोडे यांच्याकडून वाढदिवसानिमित्त 11 रुपयाच्या अनोख्या अर्थपूर्ण शुभेच्छा
श्रीनिवास कदम पाटील यांची अर्थपूर्ण शुभेच्छांची सोशल मीडियावर पोस्ट

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे- माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध बारामती झटका न्यूज पोर्टल यूट्यूब चैनल चे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीनिवास कदम पाटील  यांना अभिनेता अण्णा बनसोडे यांच्याकडून अनोख्या पद्धतीने अकरा रुपयाचे अनोख्या अर्थपूर्ण शुभेच्छा देण्यात आल्या शुभेच्छांमुळे सोशल मीडिया चर्चेला उधाण आले आहे.सविस्तर हकीकत अशी की बारामती झटका चे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी वाढदिवसाच्या आदल्या दिवशी  प्रेक्षक,चाहते,सोशल मीडियातील मित्रपरिवार यांना आवाहन केले होते.की सध्या कोरणा महामारी सुरू असल्याने मित्र परिवाराला भेटता येत नाही.कोरोना महामारी मुळे सर्वच लोकांचे अर्थकारण बिघडले आहे.त्यामुळे अनाठायी खर्च लोकांनी टाळावा वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी पेट्रोल खर्च,हारतुरे,फेटा यासाठी खर्च होतो व तो खर्च वाया जातो हा खर्च टाळून माझ्यावर प्रेम करणारे प्रेक्षक,वाचक व सोशल मीडियातील मित्रपरिवाराने वाढदिवसानिमित्त जाहिराती स्वरूपात अर्थपूर्ण शुभेच्छा द्याव्यात.अशी बातमी व पोस्ट केली होती या पोस्टचे गांभीर्य लक्षात घेऊन अभिनेता अण्णा बनसोडे यांनी फुल ना फुलाची पाकळी म्हणून श्रीनिवास कदम पाटील यांना सन्मानजनक नारळाची किंमत म्हणून ऑनलाइन अकरा रुपये देऊन श्रीनिवास कदम पाटील यांना सोशल मीडियाद्वारे वाढदिवसाच्या आदर पूर्ण शुभेच्छा दिल्या.त्या अकरा रुपया मध्ये अनेक भावना व्यक्त केल्या गेल्या आहेत. त्या भावनांचा मनस्वी स्वीकार श्रीनिवास कदम पाटील यांनी केला.श्रीनिवास कदम पाटील यांनी अतिशय विचारपूर्वक आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या होत्या.पत्रकार हा वर्षभर आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक गोष्टी जनतेच्या समोर आनत असतो.अनेक राजकीय संघटना ,विविध पक्षातील पदाधिकारी यांच्या बातम्या अहोरात्र पत्रकार प्रसिद्ध करत असतात.प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहून त्या बातमीचे कवरेज करून ती बातमी लाखो लोकांपर्यंत पोचवत असतात.त्या बातमीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी, पक्ष संघटनातील पदाधिकारी यांचं काम लाखो लोकांपर्यंत पोहोचते. त्यांना उजाळा मिळतो परंतु विचार केला तर बातमीनंतर पत्रकाराला काय मिळते? बातमी तयार करण्यासाठी पत्रकाराला गाडीमध्ये शंभर दोनशे रुपयाचे पेट्रोल टाकावे लागते,.फोर व्हीलर घेऊन गेला तर तीनशे ते पाचशे रुपये खर्च येतो.कार्यक्रमाला एक दोन तास वेळ द्यावा लागतो.बातमी तयार करायला दोन तास वेळ द्यावा लागतो.एका बातमीसाठी पत्रकाराचे ते चार ते पाच तास जातात.त्याला स्वतः इंटरनेट बॅलन्स करावा लागतो.त्याला ऑफिस असेल तर महिन्याला तीन ते चार हजार रुपये ऑफिस चे भाडे भरावे लागते.कार्यक्रमात पत्रकाराला फक्त श्रीफळ किंवा फूल दिले जाते.तेही तो तेथेच ठेवून येतो संपूर्ण दिवस जातो बाकीचे काम होत नाहीत.तरीसुद्धा पत्रकार कसलाही विचार न करता तो कार्यक्रम पार पाडतो व बातमी तयार करून प्रसिद्ध करतो.बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर काही पदाधिकाऱ्यांची नावे खालीवर होतात एखाद्याचं  नाव चुकून राहून जातं किंवा दैनिकातून कट केले जाते.सकाळी बातमी वाचल्यानंतर ज्याचे नाव खालीवर झाले आहे.ज्याचे नाव आले नाही त्याचा लगेच फोन येतो माझं नाव खाली आला आहे.माझे नाव आले नाही म्हणून नाराजी व्यक्त करतात.परंतु त्या पाठीमागे पत्रकारांचे परिश्रम त्यांच्या लक्षात येत नाही.याउलट जेव्हा दैनिक असो किंवा एखाद्या माध्यम त्यांचा वर्धापन दिन आला की दैनिकांकडून व माध्यमांकडून जाहिरतींची मागणी केली जाते.जाहिरात हेच एकमेव पत्रकारितेचे आर्थिक स्त्रोत आहे.परंतु जाहिरात मागायला गेल्यानंतर संघटना,पक्ष,प्रसिद्धी हवी असलेले लोकप्रतिनिधी जाहिरात मागायल गेल्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. उद्या देतो,परवा देतो,नंतर बघू, एका पार्टीकडे जाहिरातीसाठी अनेक वेळा जावे लागते.जाहिरात दिली तर वसुलीसाठी दहा वेळा जावे लागते. जाहिरातीचे पैसे मागितले तर लगेच राग येतो देतो की परत देतो ह्यावेळेस थोडी अडचण आली आहे. यंदा समजून घ्या असे अनेक कारणे सांगितली जातात त्या पत्रकाराला त्याच्या खिशातून माध्यमांना पैसे भरावे लागतात.त्या जाहिरातीतून पत्रकाराला 15 ते 20 टक्के कमिशन भेटत असते ते पण वेळेत पैसे दिले तर भेटतात उशीर झाला तर ते पण दिले जात नाही.जाहिरात बिल आणण्यासाठी अनेकदा फोन करावे लागतात अनेक वेळा ऑफिसला,घरी भेटायला जावे लागते.,फोन अथवा घरी,ऑफिस गेल्यानंतर आता पैसे नाहीत नंतर देतो,असे उत्तर दिले जाते. कमिशन चे पैसे पेट्रोल वारी जातात कधीकधी जाहिरातीचे पैसे बुडवले जातात ते पैसे स्वतःच पत्रकारांना भरावे लागतात याचा फटका पत्रकारांच्या कशाला बसतो.तरीसुद्धा तो बिचारा समोरच्या व्यक्तीला दुखवत नाही.परंतु सामाजिक संघटना,पक्ष पदाधिकारी,प्रसिद्धी हवे असलेले प्रतिनिधी यांना काही वाटत नाही.ते म्हणतात आमची बातमी प्रसिद्ध करा पत्रकार पुन्हा त्यांची बातमी प्रसिद्ध करतो.त्यांना मोठा करतो कारण पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे.आपली जबाबदारी प्रामाणिक पणे पार पाडतो.परंतु त्याच्या पदरात मात्र काहीच पडत नाही ही खरी शोकांतिका आहे. याचाच विचार करून श्रीनिवास कदम पाटील यांनी वाचक व प्रेक्षक,संघटना पदाधिकारी यांना आव्हान केले होते.कोरोना महामारी मुळे पत्रकारांची दयनीय अवस्था झाली आहे.जाहिरातीचे प्रमाण कमी झाले आहे. निदान वाढदिवसानिमित्त तरी अनाठायी होणारा खर्च  तेच पैसे अर्थपूर्ण शुभेच्छापर पत्रकाराला दिले तर थोडाफार दिलासा मिळेल.असा त्याचा अर्थ होता. तीन वर्षात श्रीनिवास कदम पाटील यांनी चांगली घोडदौड केली आहे.तीन वर्षात तीन ठिकाणी लोकांच्या सेवेसाठी पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर ऑफिस सुरू केले आहे. महाराष्ट्राचे राजकीय केंद्रबिंदू असलेल्या अकलूज,माळशिरस,बारामती शहरा सारख्या ठिकाणी ऑफिस आहे.महिन्याला तीन ऑफिस चे भाडे दहा ते बारा हजार रुपये भरावे लागतात दररोज तालुक्यातून फिरताना 200 ते 300 रुपयाचे पेट्रोल गाडीला भरावे लागते. बातम्या पाहणारे वाचणारे लाखो वाचक-प्रेक्षक आहेत 5000 फेसबुक फ्रेंड आहेत.दहा हजाराच्या आसपास व्हाट्सअप फ्रेंड आहे.या सर्वांच्या कडून पत्रकारांना वाढदिवसानिमित्त मोकळ्या शुभेच्छा येतात.परंतु फेसबुकच्या एक हजार लोकांनी व व्हाट्सअप एक हजार लोकांनी अण्णा बनसोडे सारखे अकरा रुपये नारळाचे म्हणून शुभेच्छा साठी पाठवले तर त्याचे गणित मोठे होईल.अकरा रुपये प्रमाणे 11×2000 लोकांनी दिले तर =22000,(11×2000=22000) रुपये होतील निदान दोन तीन महिन्याचा पेट्रोल खर्च निघेल त्या पैशात तालुकाभर भ्रमण करून आणखी बातम्या प्रसिद्ध करता येतील. 11 रुपयाने लोकांना काहीही फरक पडत नाही परंतु तेवढे सुद्धा मानसिकता लोकांची नाही.सदर या अर्थपूर्ण शुभेच्छा चा अर्थ वाचक आणि प्रेक्षकांना मनापासून कळायला हवा.यामध्ये पत्रकारांचा दुःख दडलं आहे. खरोखर हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे या उपक्रमाचे सोशल मीडियात चर्चा होत आहे.आता पत्रकारांकडून फुकट्या लोकांसाठी अर्थपूर्ण शुभेच्छांची श्रीनिवास कदम पाटलांकडून ऑफर देण्यात आली आहे.

You may have missed