सात वर्षांच्या पाठपुराव्यानंतर जादूटोणा विरोधी कायदा शासकीय समिती चा मुहूर्त निघाला.. पी एस खंदारे यांच्या पाठपुराव्याला यश

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क वाशिम –समाजातील अनिष्ट रुढी, प्रथा, परंपरा समूळ नष्ट व्हाव्यात व समाजात संत, समाजसुधारकांचे विवेकी विचार व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा म्हणून शहीद डा नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या वतीने जानेवारी १९८९साली” दैनिक सकाळ “पुणे यांच्या मदतीने अंधश्रद्धा निर्मूलनाचा जाहिरनामा तयार झाला. माजी पोलिस महासंचालक भास्करराव मिसर यांच्या पुढाकाराने तयार झालेला कायद्याचा मसुदा १९९१साली त्या वेळचे मुख्यमंत्री मा. शरद पवार यांना देण्यात आला. १९९५साली शिवसेना भाजपाचे सरकार असताना नांदेड चे शिक्षक आमदार पी. जी. दस्तुरकर यांनी या कायद्याबाबतचा अशासकिय ठराव विधान परिषदेत मांडला. परंतु पुढे काहीही झाले नाही म्हणून डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या समवेत प्रा. डाॅ. एन.डी.पाटील, डाॅ. श्रीराम लागू, अभिनेता निळू फुले, माजी पोलिस महासंचालक भास्करराव मिसर, प्रा. पुष्पा भावे, अविनाश पाटील आदी मान्यवर मंडळी सह अनेक आमदार कायदा पारित करण्यासाठी प्रयत्न करत होते. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळे संविधानिक मार्गाने अंदोलन राबविले गेले या मध्ये दहा हजार रक्ताने पत्र लिहिले गेले,आझाद मैदानावर धरणे आंदोलन झाली, प्रत्येक जिल्हा व तालुका स्तरावर निवेदन दिले परंतु अंनिस च्या कार्यकर्त्यांनी अविरतपणे संघर्ष सुरू ठेवला, महाराष्ट्र शासनाच्या नाकर्तेपणाचा व दिरंगाई चा निषेध करण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा च्या कालहरणाची काळी पत्रीका महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे ८जुलै २०१३रोजी पुण्यात पत्रकार परिषदेत प्रकाशित करण्यात आली. त्यानंतर अंनिस चे संस्थापक कार्याध्यक्ष डाॅ. नरेंद्र दाभोलकर व अविनाश पाटील यांनी राज्यातील तिस जिल्ह्यात पत्रकार परिषदा घेऊन काळ्या पत्रिकेचे प्रकाशन केले त्यांची सर्व माध्यमांनी दखल घेतली व व्यापक चर्चा झाली दि. २०ऑगस्ट २०१३रोजी पुण्यात डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांचा खुन झाला. व डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर अठरा वर्षं संसदीय प्रक्रियेत रखडलेला कायदा डिसेंबर २०१३च्या हिवाळी अधिवेशनात पारित करण्यात आला. कायद्याची प्रभावी अमलबजावणी करण्यासाठी २०१४मध्ये राज्यव्यापी जादूटोणा विरोधी कायदा अमलबजावणी मोहीम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात राबवून जनजागृती करण्यात आली. शासकीय स्तरावर योग्य अमलबजावणी करण्यासाठी सामाजिक न्याय विभाग मंत्रालय मुंबई तर्फे “जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार व प्रसार कार्यक्रम अमलबजावणी समिती “PIMCगठित करण्यात आली व राज्य, विभागीय व जिल्हा स्तरावर शासकीय समिती स्थापन करण्यासाठी चे शासन निर्णय व परिपत्रक काढले गेले, दिनांक १६आक्टोंबर २०१४च्या पत्रान्वये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती वाशिम शाखेचे कार्याध्यक्ष पी एस खंदारे यांनी अप्पर जिल्हाधिकारी वाशिम व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण वाशिम यांना वेळोवेळी निवेदन देऊन पाठपुरावा केला अखेर दि. २८जुन २०२०रोजी वाशिम जिल्हा पालकमंत्री मा. ना. शंभुराज देसाई यांना निवेदन देऊन पाठपुरावा केला व मा.पालकमंत्री यांनी तातडीने जिल्हा अधिकारी व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण वाशिम यांना पत्र देऊन समिती स्थापन करण्यासाठी चे आदेश दिले या नुसार दि. १० ऑगस्ट २०२१ला बैठक घेऊन अखेर समिती तयार झाली या समिती चे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून अप्पर जिल्हाधिकारी व सदस्य सचिव म्हणून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण,सदस्य म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक, शिक्षणाधिकारी (माध्यमीक) तर अशासकिय सदस्य म्हणून प्रा. ऊन्मेश घुगे, पुंजाजी सदाशिव खंदारे, श्रीमती कुसुम सोनुने, दतराव कोंडजी वानखेडे, विजय देवीदास भड, डाॅ. रामकृष्ण सखारामजी कालापाड आदींची निवड झाली असुन.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती वाशिम शाखेचे कार्याध्यक्ष पी एस खंदारे यांनी सात वर्षे सलग पाठपुरावा केला व अखेर शासकीय समिती गठित झाल्याने समाधान व्यक्त केले.
वाशिम जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्तीची जादूटोणा विरोधी कायदा अंतर्गत फसवणूक, दिशाभूल अथवा शारिरीक आणि मानसिक व आर्थिक शोषण होत असल्यास पी. एस.खंदारे मो. नं. ८००७४६८१५०,डाॅ. रामकृष्ण कालापाड मो. नं ९५११७५२३६१,प्रा. ऊन्मेश घुगे मो. नं. ८५५४८८४०२० यांना संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या वतीने पी एस खंदारे यांनी केले आहे
.