पिरळे येथे मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद देत शांततेत मतदान.
पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क प्रमोद शिंदे
पिरळे तालुका माळशिरस येथे उस्फुर्त प्रतिसाद देत मतदारांनी शांततेत मतदान केले.मतदारांनी लोकशाहीचा उत्सव चांगला प्रतिसाद देत साजरा केला.माळशिरस तालुका 254 अनुसूचित जाती विधानसभा निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांना मतदार संघातील मतदारांनी स्फुर्तपणे प्रतिसाद दिला आहे . पिरळे येथे एकूण तीन बुथ होते तीन बूथ वरील एकूण मतदान 3008
पैकी 2154 मतदान पोल झाले आहे 69.33% मतदान झाले असून. बुथ क्रमांक 61- 951 पैकी-महिला-332, पुरुष-373 व इतर दोन-2 एकूण=707,बुत क्रमांक-62-एकूण मतदान-1047, पैकी-711, महिला-317, पुरुष 394, एकूण=711, बुथ क्रमांक-63- 1110, पैकी-महिला-361, पुरुष 375, एकूण=736, अशाप्रकारे मतदान झाले असून. वृद्ध अपंग व महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदाराचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून. आता मतदारांना 23 तारखेच्या निकालाची प्रतीक्षा लागली आहे.