१२५ वर्ष पूर्ती पंचवार्षिक मानस्तंभ महोत्सवानिमित्त दहिगाव येथे विविध कार्यक्रम.
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-प्रमोद शिंदे
सालाबाद प्रमाणे श्री 1008 महावीर स्वामी दिगंबर जैन अतिशय क्षेत्र दहिगाव ता माळशिरस जि. सोलापूर येथे वार्षिक रथोत्सवास कार्तिकी वद्य पंचमी निमित्त बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर2024 रोजी रथोत्सवाची सुरुवात होत आहे. तसेच 125 वर्ष पूर्ती पंचवार्षिक मानस्तंभ अभिषेक महोत्सव निमित्त अतिशय क्षेत्र दहिगाव येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 ते 10 वा.पर्यंत भगवान श्री यांचा अभिषेक संपन्न होणार असून 11ते 2 मंदिरामध्ये संगीतमय भक्ताम्बर विधान मध्यान दुपारी 2 वाजता श्री 1008 जिनेन्द्र देवाधिदेव यांची पालखी शोभायात्रा,पंडित चंद्रगुप्त वाटिका येथे संगीतमय बोली वअभिषेक.गुरुवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ ते साडेनऊ श्री 1008 बाहुबली भगवान यांचा अभिषेकब्रह्म महतीसागर चरण पादुका अभिषेक सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत संगीतमय शांतिनाथ विधान तसेच सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत सर्व रोगनिदान शिबिराच्या आयोजन. मधुमेह, मोतीबिंदू, मणक्याचे पाठीचे आजार असणाऱ्या रुग्णांनी शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 7:30 वाजता मानस्तंभ पायाड उद्घाटन ,8 वा.मानस्तंभ अभिषेक,पाच मजली भव्य लाकडी धर्म रथामधून श्री 1008 भगवान महावीर स्वामी यांची भव्य दिव्य अशी शोभायात्रा निघेल दुपारी बारा वाजता सभामंडप उद्घाटन, सभा मंडपामध्ये रथा मधून मूर्ती घेण्याचा कार्यक्रम संगीताचा कार्यक्रम होणार असून या रथउत्सवात महाराष्ट्रातून व इतर राज्यातून अनेक भाविक येत असतात. या कार्यक्रमाचे आयोजन समस्त जैन बांधव व मंदिर समितीच्या वतीने करण्यात येते.या कार्यक्रमासाठी मंदिर विश्वस्त कमिटी कार्यकारणी सदस्य महावीर सेना नातेपुते महती सेना दहिगाव विशेष परिश्रम घेत आहेत.