दहिगाव येथे रथोत्सवानिमित्त 25 वे सर्वरोग निदान शिबिर संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –


श्री 1008 महावीर स्वामी दिगंबर जैन मंदिर अतिशय क्षेत्र दहिगाव येथे रथ उत्सवानिमित्त भव्य मोफत नेत्र व सर्व रोग निदान शिबिर संपन्न झाले.प्रथम कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीत,व भगवान महावीर प्रतिमापूजन तसेच दीप प्रज्वलन करून करण्यात आली. हे शिबिर ऍड श्री धन्यकुमार मोहनलाल दोशी फाउंडेशन मुंबई, स्वर्गवासी सौ. कमल धन्यकुमार दोशी यांचे स्मरणार्थ माजी अध्यक्ष विजयकुमार मोहनलाल दोशी यांचे संयुक्त विद्यमाने 25 वा सामाजिक उपक्रम घेण्यात आला. या शिबिरात नेत्र तपासणी, मधुमेह, रक्त तपासणी,इसीजी, हाडांचे आजार, मोतीबिंदू, रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. या शिबिरास डॉक्टर अजिंक्य होरा, डॉक्टर चिराग होरा,सौरभ गांधी, डॉ. अक्षय दोशी,डॉ.उत्कर्ष गांधी,डॉ.सनी गांधी, डॉ. सुनय गांधी,डॉ. तेजस चंकेश्वर,डॉ.अनुजा दोशी, गोमटेश दोशी आधी डॉक्टरांनी रुग्णांना मोफत सेवा दिली. याप्रसंगी सेक्रेटरी संजय कुमार दोशी, सरपंच पूनम खिलारे, रामचंद्र पाटील,ए.पी.आय.महारुद्र परजणे, पीएसआय विक्रांत दिघे, नरेंद्र गांधी, डॉक्टर अमृता कामते, शितल गांधी,वैभव शहा, संस्थेचे अध्यक्ष, सेक्रेटरी, विश्वस्त, खजिनदार, उपस्थित होते.डॉ. चिराग होरा बोलताना म्हणाले की शिबिरासाठी डॉक्टर्स, लॅब, मेडिकल सर्वांचे सहकार्य लाभल्यामुळे अनेक रुग्णांना त्याचा फायदा होतो. भविष्यातील अशा प्रकारचे काम सुरू राहील.नरेंद्र गांधी बोलताना म्हणाले आरोग्य शिबिर 25 वर्षापासून सुरू आहे. आज मानस थांबायला 125 वर्षे पूर्ण होतात. असेच भगवान महावीरांच्या मूर्तीला 175 वर्षे पूर्ण झालेले आहेत. सर्व ग्रामस्थांच्या व समाज बांधवांच्या मदतीने सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवले जातात.570 रुग्णांची तपासणी करण्यात आली.270 रुग्णांचे डोळे तपासणी करून 100 चष्म्यांचे वाटप करण्यात आले,41 रुग्णांची स्पायरोमॅटिक, ECG, रक्त तपासणी करण्यात आली,फुफूसाची चाचणी करण्यात आली रुग्णांना मोफत चष्मे देण्यात आले.अमित शहा,अमोल गांधी,दीपक दोशी,गोमटेश दोशी, अमित गांधी, अमोल गांधी,नातेपुते व अकलूज मेडिकल असोसिएशनच्या वतीने औषधांचा  पुरवठा करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी  होण्यासाठी सकल जैन समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

You may have missed