कल्याण येथे महाकवी मधुकरजी घुसळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त वैभव गिते यांना समाज भूषण पुरस्कार

पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क संदेश भालेरावसोनियाची उगवली सकाळ…” या भिमगीताचे गीतकार महाकवी कालकथित मधुकरजी घुसळे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित वालधुनी- कल्यान येथे आयोजित ‘निखळला तारा..’ या कार्यक्रमा निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मा. वैभवजी गिते यांना “महाकवी मधुकरजी घुसळे समाजभूषण” पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. मुख्य आयोजक आयु.संदीप घुसळे व सिध्दांत संदिप घुसळे यांनी केले
याकार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना एन.डी.एम.जे. संघटनेचे राज्य सचिव मा वैभव गिते साहेब् यांनी “दिवंगत मधुकरजी घुसळे यांनी लिहिलेली अनेक सांस्कृतिक व बुद्ध-भीमगीते ही महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक वामनदादा कर्डक, प्रल्हाद शिंदे आणि आनंद शिंदे यांनी गाईली आहेत. या गीतांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सांस्कृतिक चळवळीचा वारसा जपण्याचे कार्य त्यांनी केले आहे, त्यांचे नाव हे नक्कीच आंबेडकरी चळवळीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल” असे म्हटले.

यावेळी एन.डी.एम.जे. संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आयु.विजय कांबळे, , कल्याण डोंबिवली शहर अध्यक्ष ॲड. प्रविण बोदडे, ठाणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख संदेश भालेराव ,प्रणव भागवत, प्रचित भालेराव इत्यादी उपस्थित होते.

You may have missed