एन.डी.एम.जे. पदाधिकाऱ्यांकडून सुप्रसिद्ध कलाकार गणेश आहीरे यांचा सत्कार
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क संदेश भालेराव –एन.डी.एम.जे.महाराष्ट्र राज्य महासचिव मा.अॅड.डाॅ.केवलजी उके साहेबांनी व ठाणे जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून सुप्रसिद्ध कलाकार गणेश आहीरे यांचा सत्कार करण्यात आला
वासिंद मधील मिमिक्रि एन्ड डान्सर ,अभिनयाचा बादशहा अशी ओळख असलेले गणेश आहिरे यांचा युटुबवर सध्या चर्चेत असलेला मराठी शाँर्ट फिल्म मायेचा पदर लोकांच्या पसंतीस खुपच हिट झालेला दिसतोय. सध्या वासिंद शहरात एकच चर्चा जोरदार चालु आहे.ते म्हणजे अभिनेता गणेश आहिरे यांची मुळचा वारसा लाभलेले दिवंगत रमेश आहिरे महाराष्ट्राचे प्रसिद्ध तबला वादक यांचे तृतीय पुत्र अभिनेता गणेश आहिरे यांना सुध्दा लहानपणापासूनच कलेची आवड निर्माण झाली. इयत्ता सातवी मध्ये असताना त्यांनी कलाक्षेत्रात त्यांनी पहिले पाऊल टाकले .त्यांच्या फुलोसा चेहरा तेरा ह्या गाण्यावर नृत्य सादर करुन समस्त वासिंदकरांची मने जिंकली .त्यानंतर त्यांच्या आयुष्याला सुरुवात झाली .डान्सर कवी,गीतकार ,अँकर,आणि आता नुकताच कृणाल जाधव ( शहापुर ) यांनी दिग्दर्शक केलेला मराठी शाँर्ट फिल्म “मायेचा पदर “यात त्यांनी सादर केलेली दारुच्या आहारी गेलेल्या नशेबाज बापाची भुमिका रसिक प्रेक्षकांनीच उचलुनच धरली . तसेच नुकताच रिलीज झालेल गणेशोत्सवात मधे “दे पैसा दे पैसा बाप्पा आला घरी” हे गाणि सुध्दा खुप हीट चालु आहे. दोन हात करत हा अवलीया कलाकार आपल्या कलेवर प्रेम करत वेळात वेळ काढून आपली कला सादर करत असतो. तेवढ्याच मोठ्या मनाचा हा कलाकार कोणताही अभिमान न बाळगता प्रत्येक कार्यक्रमाच्या ठिकाणी आपली हजेरी दर्शवतो .तो सांगताना नेहमी म्हणतो अनुभव हाच माझा गुरु .कोणताही गुरु न लाभलेल्या या कलाकारांने आज आपली स्वताची ओळख स्वताच्या हिमतीवर व त्याला त्याच्यावर असलेल्या विश्वासावर निर्माण केली.आज इथपर्यंत पोहचण्यात ज्या ज्या व्यक्तीचे त्याला सहकार्य लाभले हे ही तो प्रामाणिकपणे जाहीर करतो. व त्या सर्वांचे आभार मानतो कि आज मी जे काही आहे ते माझ्या मित्रपरिवार व माझे चाहते तसेच रसिक प्रेक्षकांमुळे मी आज येथे पोहचलो.अशा या कलाकाराला आमच्या नॅशनल दलित मूव्हमेंट फाॅर जस्टीस महाराष्ट्र राज्य महासचिव मा.अॅड.डाॅ.केवलजी उके साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
दिनांक १०\९\२०२१रोजी नियोजित कार्यक्रम डाॅ.केवलजी उके साहेबांच सत्कार तसेच शहापूर तालुक्यातील नवयुवकांना नियुक्तीपत्र देण्यात आले ह्या वेळेस सुप्रसिद्ध कलाकार गणेश आहीरे यांना शहापूर तालुक्यातील एन.डी.एम.जे.सहसचिव पद देऊन डाॅ.केवलजी उके साहेबांनी सत्कार करून सन्मानित केले .
ह्या वेळेस उपस्थित मान्यवर मुंबई ठाणे प्रदेश टीम, ठाणे जिल्हा टीम, कल्याण डोंबिवली शहर जिल्हा टीम ,शहापूर तालुका टीम, वंचित बहुजन शहापूर टीम व स्थानिक ग्रामस्थ मंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते
प्रतिनिधि संदेश भालेराव