दरोड्या सारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नातेपुते पोलीस स्टेशन च्या वतीने ७ ऑक्टोबर रोजी ग्राम सुरक्षा यंत्रणा कडून प्रशिक्षण शिबिर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)-
नातेपुते पोलीस स्टेशनच्या वतीने शुक्रवार दिनांक7 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10 .00 वा मधुर मिलन मंगल कार्यालय नातेपुते येथे ग्रामसुरक्षा यंत्रणा यांच्यामार्फत प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले आहे शिबिर वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी चोरी दरड यासारख्या घटना वाहन चोरी महिला संदर्भात गुन्हे अपघात लहान मुलं हरवणे वन्य प्राण्यांचा हल्ला आग जळीत यासारख्या घटना मध्ये लोकांना तातडीची मदत मिळण्यासाठी चादूर घटनांना आळा घालण्यासाठी प्रत्येक गावात ग्रामसुरक्षा दल यांना प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. तरी नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पत्रकार बंधु ,सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य ,पोलीस पाटील , ग्रामसेवक ,तलाठी, तसेच किराणा दुकानदार व्यापारी नातेपुते पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक युवक यांनी ग्रामसुरक्षा प्रशिक्षणाबाबस हजर राहावे असे आवाहन नातेपुते पोलीस स्टेशनचे ए.पी.आय मनोज सोनवलकर यांनी केले आहे.सदर प्रशिक्षण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम,अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव ,अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार असून या शिबिरामध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणा बाबत माहिती देऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, गुन्ह्यांचे प्रकार रोखण्यासाठी या प्रशिक्षण शिबिरात ग्रामसुरक्षा यंत्रणा अँड्रॉइड मोबाईल ॲप बाबत माहिती देण्यात येणार असून या प्रशिक्षण शिबिरासाठी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे .


