भाजपने देश लुटला -माजी आ.ऍड रामहरी रुपनवर




भाजपने देश लुटला -माजी आ.ऍड रामहरी रुपनवर
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते( प्रतिनिधी)–भाजपने देश लुटला आहे असे प्रतिपादन विधान परिषद माजी आमदार ऍड रामहरी रुपनवर यांनी महा विकास आघाडी च्या वतीने घेण्यात आलेल्या निषेध सभेत करण्यात आले.नातेपुते तालुका माळशिरस येथे केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात उत्तर प्रदेश येथील लखीमपुर येथे शेतकऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत माझे आ.रामहरी रुपनवर यांनी कडाडून टीका केली.केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात तीन काळे कायदे केले आहेत. म्हणून त्याच्या वरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन उभे केले आहे
परंतु केंद्रातील गृहराज्यमंत्री यांच्या मुलाने शेतकरी गाडीखाली चिरडले या सरकारला सात वर्षात एक ही नवीन योजना आणता आली नाही.देशातील स्वायत्त संस्था हातात घेतल्या आहेत.हे जुलमी सरकार आहे. सरकारला घालवले शिवाय आम्ही राहणार नाही. जनतेचा पैसा स्वतःच्या फायद्यासाठी वापरला जातो. ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे.अशा प्रकारे भाजप वर काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आमदार रामहरी रुपनवर यांनी टीका केली. तसेच राष्ट्रवादी चे ज्येष्ठ नेते धैर्यशील देशमुख बोलताना म्हणाले की भारत बंद असताना देखील आम्ही व्यापारांचा विचार करून निषेध सभेचे आयोजन केले आहे.भाजप सरकारने पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ वाढवले आहेत.पत्रकारांना सुद्धा मारण्याचं काम हे सरकार करत आहे. अशाप्रकारे भाजपा सरकार चा निषेध व्यक्त केला यावेळी अक्षय भांड, हनुमंत साळुंखे,किशोर झगडे, सागर बीचुकले, विशाल साळवे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी राजकुमार हिवरकर, सेनेचे अमोल उराडे, रावसाहेब पांढरे, सुरेश पांढरे, विठ्ठल ठोंबरे,संदीप ठोंबरे,शुभम सोरटे तसेच महाविकास आघाडीतील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.