माळशिरस विधानसभा उमेदवारांचे भवितव्य केले मतदारांनी मतपेटीत बंद

माळशिरस (प्रमोद शिंदे): माळशिरस विधानसभा उमेदवारांचे भवितव्य मतदारांनी 21 तारखेला केले मतपेटीत बंद माळशिरस विधानसभा लढत ही रंगतदार होणार असून ही लढत तिरंगी लढत दिसून आली आहे. माळशिरस विधानसभा निवडणूक ही काटे की टक्कर झाले आहे. ही निवडणूक राष्ट्रवादी आणि भाजप यांच्या अस्तित्वाची लढाई होती संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष माळशिरस विधानसभेवर असून इथे कोण जिंकणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात अनेक घडामोडी झाल्या आहेत या मतदारसंघात पवार विरुद्ध मोहिते पाटील अशीच अस्तित्वाची लढाई असल्याचे दिसून येत आहे यातच भाजपचे कट्टर समर्थक समजले जाणारे तसेच मोहिते-पाटील विरोधक मानले जाणारे उत्तम जानकर यांना भाजपने तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी कडून तिकीट मिळवले. त्यामुळे येथील राजकीय वातावरणात बदल झाला आहे. मोहिते-पाटलांना लोकसभेला तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी भाजपात प्रवेश केला व आपले अस्तित्व सिद्ध केले. आत्ता सुद्ध विधानसभेला तीच परिस्थिती आहे. विधानसभेला हा मतदारसंघ राखीव असल्यामुळे ही जागा आरपीआय ला सोडण्यात आली होती परंतु उमेदवार हे मोहिते-पाटील ठरवणार असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले त्यामुळे येथील राजकीय वातावरण आणखीन वेगळ्या वळणावर येऊन थांबले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील राम सातपुते यांना तिकीट देण्यात आले व मोहिते पाटील कुटुंबीय राम सातपुते यांच्यासाठी अटीतटीचे प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीची अडचण झाली होती. त्यातच उत्तम जानकर यांचा जातीचा दाखला वैध झाल्याने माळशिरस तालुक्यातील वातावरण आणखीन बदलले माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी बॅकफूटवर गेली होते पुन्हा फ्रंट फूट वर आली ही लढाई खरंतर राम सातपुते विरुद्ध उत्तम जानकर अशी नसून मोहिते पाटील विरुद्ध पवार व जानकर असल्याचे दिसत आहे. रिपाईला जागा सोडून उमेदवार मात्र भाजपा आरएसएस चा दिल्यामुळे आरपीआयच्या काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून आली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची सभा झाली या सभेला नेते हजर पण कार्यकर्ते गैरहजर अशी परिस्थिती होती. माळशिरस येथील रामदास आठवले व विजयसिंह मोहिते पाटील यांची सभा फेल गेली त्यामुळे माळशिरस विधानसभेतची निवडणूक एकतर्फी होणार नसल्याचं चित्र स्पष्ट झाले आहे. त्यात वंचित बहुजन आघाडी ने ही नातेपुते येथील राजकुमार यांना उमेदवारी देऊन रणांगणात उभे केले त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे मतदान हे निर्णय मतदान ठरणार असून वंचित बहुजन आघाडी च्या उमेदवारांमुळे कोणत्यातरी मोठ्या उमेदवाराला याचा फटका बसणार आहे. ही निवडणूक मोहिते पाटील कुटुंबीयांसाठी अस्तित्वाचा आणि महत्वाची निवडणूक असल्यामुळे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला आहेत. तसेच शरद चंद्रजी पवार साहेब यांनीही या मतदारसंघात चांगले लक्ष घातले असून राष्ट्रवादीचा उमेदवार कशाप्रकारे निवडून येईल यासाठी पूर्णपणे ताकद लावली आहे. उद्या दिनांक 24 ऑक्टोबर 2019 रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निकालाची जनता आतुरतेने वाट पाहत असून जनतेने कौल कोणाच्या बाजूने दिला आहे पाहण्यासाठी उत्सुकता लागली आहे. दिनांक 21 /9 /2019 रोजी माळशिरस विधानसभा गाव निहाय खालील प्रमाणे झालेले मतदान- शिंदेवाडी ३१६१ पैकी १९५८ (६३.९७%),देशमुखवाडी १३०३ पैकी ९१३ (७०.०७%),कुरबावी २१२४ पैकी १३६८ (६४.४१%),डोंबाळवाडी कु १४२० पैकी १०५७ (७४.४४%),हनुमानवाडी ९२८ पैकी ६३० (६७.८८%),धर्मपुरी ३७९३ पैकी २३६९(६२.४६%),कोथळे ११८३ पैकी ७२४ (६१.२०%),कारुंडे २९५५ पैकी २०५८(६९.६४%),गुरसाळे ३६९५ पैकी २३०५ (६२.३८%),तांबेवाडी ९९६ पैकी ६१६ (६१.८५%),एकशिव २९०० पैकी २०१५ (६९.४८%),कळबोली १०५५ पैकी ६७४ (६३.८९%),दहीगाव ७०७३ पैकी ४५०४ (६३.६८%),मोरूची ३९६० पैकी २५४० (६४.१४%),पिंपरी २८०८ पैकी १५९३ (५६.७३%),नातेपुते १३८६५ पैकी ८४९७ (६१.२८%),पिरळे २८१७ पैकी १९३३ (६८.६२%),बंगार्डे १५२२ पैकी १२२२ (८०.२९%),पळसमंडळ १९९१ पैकी १२११ (६०.८२),मोटेवाडी फोंडशिरस १२१० पैकी ७८३ (६४.७१%),कदमवाडी ९०० पैकी ६४९ (७२.११%),फोंडशिरस ६८८५ पैकी ४६६२ (६७.७१%),लोणंद १९६० पैकी १३८१ (७०.४६%),फडतरी २६३५ पैकी १६१७ (६१.६७%),नीटवेवाडी फडतरी ५५६ पैकी ३८७ (६९.६०%),लोंढेमोहितेवाढी १२०९ पैकी ८०९ (६६.९१%),गिरवी २८७६ पैकी १८४० (६३.९८%),मांडवे ५८६९ पैकी ३९७६ (६७.७१%),खुळेवाडी ११८० पैकी ८०३ (६७.७१%),तामशिदवाडी १२४३ पैकी ८५७ (६८.९५%),मारकडवाडी फो २२८४ पैकी १६९४ (७४.१७ %),उंबरे दहीगाव २१६६ पैकी १६३८ (७५.६२%),मेडद ३६३८ पैकी २३७२ (६५.२०%),सदाशिवनगर २८३० पैकी १७१० (६०.४२%),पुरंदावडे २३९२ पैकी १५२६ (६३.८०%),जाधववाडी १८१७ पैकी ११८४ (६५.११%),कण्हेर ३८१९ पैकी २३९४ (६२.६९%),भांब १४६७ पैकी ७५३ (५१.३३%),रेडे २३३१ पैकी १२९७ (५५.६४%),भांबूर्डी ३६३१ पैकी २२६५ (६२.३८%),येळीव १०८३ पैकी ७२७ (६७.१३%),कचरेवाडी २१७१ पैकी १७१५ (७९.००%),तिरवंडी २९१९ पैकी २१३१ (७३.००%),चाकोरे २३९१ पैकी १८०४ (७५.४५%),कोंढबावी २२३३ पैकी १६९५ (७५.९१%),वटफळी ८६३ पैकी ६२६ (७२.५४%),माळशिरस १५४६६ पैकी ९७९९ (६३.३६%),मोटेवाडी माळशिरस १९३९ पैकी १४०० (७२.२०%),इस्लामपूर २९३१ पैकी २१२० (७२.३३%),गोरडवाडी २५६३ पैकी १९०६ (७४.३७%),मांडकी २४४६ पैकी १३४५ (५४.९९%),जळभावी १३८६ पैकी ८०७ (५८.२३%),गारवाड १२२५ पैकी ७६७ (६२.६१%),तरंगफळ १८६४ पैकी १४७९ (७९.३५%),झंजेवाडी ५१० पैकी ५२५ (८३.३३%),डोंबाळवाडी १०९१ पैकी ६६९ (७९.६५%),पानीव २२६७ पैकी १६६२ (७३.३१%),विजयवाडी १२६९ पैकी ९४७ (७५.२२%),गिरजणी २१६३ पैकी १६१५ (७४.६६%),बागेचीवाडी २८७० पैकी १९७७ (६८.८९%),आनंदनगर २३१० पैकी १६७३ (७२.४२%),यशवंतनगर १०३८२ पैकी ६६९६ (६४.५०%),विझोरी २२८५ पैकी १५६४ (६८.४५%),खुडूस ४८३० पैकी ३५०९ (७२.६५%),चांदापुरी १७११ पैकी १३१२ (७६.६८%),पठाणवस्ती १५७२ पैकी १०३७ (६५.९७%),मगरवाडी १३१७ पैकी ७७८ (५९.०७%),सुळेवाडी २४२० पैकी १२९५ (५३.५१%),पिलीव ७७११ पैकी ५१३० (६६.५३%),झिंजेवस्ती १०७३ पैकी ७१५ (६६.६४%),कुसमोड १७०० पैकी १२१० (७१.१८%),निमगाव मगराचे ६२३४ पैकी ४५११ (७२.३६%),पिसेवाडी २८०९ पैकी २२०१ (७८.३६%),दत्तनगर ११०५ पैकी ७८० (७०.५९%),चांडेश्वरवाडी ३२२४ पैकी २३७० (७३.५१%),माळेवाडी अकलूज ३४९८ पैकी २२७० (६४.८९%),अकलूज २८५२२ पैकी १७७५५ (६२.२५%),संग्रामनगर अकलूज ५०४८ पैकी २८५३ (५६.५२%),माळीनगर ७६०५ पैकी ४४४२ (५८.४१%),सवतगव्हाण १९१९ पैकी १२३४ (६४.३०%),बिजवडी ९५३ पैकी ७०० (७३.४५%),तांबवे २६९३ पैकी १८५४ (६८.८५%),गणेशगाव १०८५ पैकी ७५३ (७०.७०%),संगम १९२४ पैकी १३८७ (७२.०९%),बाभूळगाव १४०६ पैकी १०३१ (७३.३३%),खंडाळी ४६७२ पैकी ३३६२ (७१.९%),वेळापूर १२६८५ पैकी ८६१८ (६७.९४%),मळोली ४८४१ पैकी ३२७८ (६७.७१%),साळमुखवाडी ५०६ पैकी ३९३ (७७.६७%),काळमवाडी १२३८ पैकी ९२१ (७४.३९%),बचेरीवाडी २०७९ पैकी १५७० (७५.५२%),शिंगुर्णी २२०१ पैकी १४७० (६६.७९%),कोळेगाव ३९४० पैकी २८४३ (७२.१६%),फळवणी ३१४३ पैकी २१६० (६८.७२%),तांदूळवाडी ५८५८ पैकी ३९५६ (६७.५३%),शेडेचिचं ९८२ पैकी ७५७ (७७.०९%),धानोरे १४०८ पैकी १११७ (७९.३३%),तोंडले १९३७ पैकी १३९९ (७२.२३%),द्सूर १५०४ पैकी १२६८ (८४.३१%),बोंडले १५०२ पैकी ११४१ (७५.९७%),उघडेवाडी २४३१ पैकी १९२६ (७९.२३%)

You may have missed