माळशिरस मध्ये राम सातपुते यांचा निसटता विजय अवघ्या २५९० मतानी राम सातपुतेचा विजय
माळशिरस मध्ये राम सातपुते यांचा निसटता विजय
अवघ्या २५९० मतानी राम सातपुतेचा विजय
नातेपुते (प्रमोद शिंदे )-माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादीचे उत्तम जानकर व आर पी आय पुरस्कृत भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीचे उत्तम जानकर यांचा अवघ्या २ हजार ५९० मतांनी पराभव झाला असून, राम सातपुते यांचा येथे निसटता विजय झाला असून विजयानंतरही मोहीते-पाटीलांच्या मतात झालेली घट अत्मचिंतन करायला लावणारी आहे.
अत्यंत चुरशिच्या या निवडणुकीत आत्तापर्यत मोहिते-पाटिल गटाची एकहाती विजयाची परंपरा मोडीत निघाली आहे.अवघ्या २ हजार ५९० मताच्या फरकाने भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा विजय झाला .
मतमोजणीची सुरुवात सकाळी ९ वाजता झाली पहील्या फेरीचा निकाल हाती येताच राष्ट्रवादीचे उत्तमराव जानकर यांनी ५ हजार ६९ मतांची आघाडी घेतली हा आकडा वाढत जात १२ व्या फेरीत १६ हजार ५९७ मतांची आघाडी घेतली मात्र १३ व्या फेरीपासुन हा मतांचा आलेख खाली येऊ लागला अखेर २१ व्या फेरीत २ हजार ८५३ मतांनी आर पी आय पुरस्कृत भाजपाच्या राम सातपुते यांनी आघाडी घेतली २२ व २३ व्या फेरीत मताधीक्य कमी झाले २४ व्या फेरीत २ हजार ३११ मताधीक्य मिळवल तर अखेरच्या फेरीत २०६८ मतांची आघाडी मिळाली व पोस्टल ५२२ मतात आघाडी घेत २५९० मतांनी राम सातपुते विजय ठरले .
उमेदवार निहाय आकडेवारी पुढील प्रमाणे
राम विठ्ठल सातपुते (भाजप ) १०३५०७
उत्तमराव शिवदास जानकर (राष्ट्रवादी ) १००९१७ राज यशवंत कुमार ( वंचित बहुजन आघाडी ) ५५३८ ,श्रीकृष्ण ज्ञानदेव प्रक्षाळे (बसपा ) १०८१ अशोकराव सोपानराव तडवळकर -सर ( भारतीय प्रजा स्वराज्य पक्ष ) ६९५ , मकरंद नागनाथ साठे (अपक्ष ) ६८० ,उत्तम एकनाथ मोटे (अपक्ष) ५३४ , बापूराव महादेव अहिवळे (अपक्ष ) ३९० नोटा १८९९ , पोस्टल अवैध्य ७०
सुरुवातीला मोहिते-पाटलांना एकतर्फी वाटणारी माळशिरस विधानसभेची निवडणुक भाजपने बाहेरचा उमेदवार दिल्यामुळे अत्यंत अटीतटीची झाली होती.उत्तम जानकरांनी राष्ट्रवादी पक्षातुन दिलेली लढत ही लक्षवेधी ठरली आहे.या निवडणुकीत भाजपचा विजय झाला असला तरी निसटत्या विजयामुळे मोहिते-पाटलांचा पराभवच म्हणावा लागेल असा निकाला या निवडणुकीत लागला आहे. राष्ट्रवादीचे उत्तम जानकर यांचा पराभव वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार राजकुमार सोनवणे यांच्यामुळेच झाला असे म्हणता येईल यांना 5538 ते पडले याचा फटका उत्तमराव जानकर यांना पडला ही जागा अनुसूचित जाती राखीव असताना उत्तम जानकर यांचा जात प्रमाणपत्र दाखला उच्च न्यायालयाने वैध ठरवल्याने व माळशिरस ची जागा ही आरपीआयला सुटली असताना तेथे उमेदवार मात्र आयात भाजपचा दिला असल्याने स्थानिक लोक नाराज होते यामुळे लोकांनी वंचित चा व नाटो चा पर्याय निवडल्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजप या दोघांना याची किंमत मोजावी लागली याचाच परिणाम राष्ट्रवादीचा पराभव व भाजपचा निसटता विजय हा झाला.
भाजपच्या विजयानंतर तालुक्यात मोहिते-पाटील व भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात गुलालाची उधळन व फटक्याची अतिशबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.शंकरनगर येथिल शिवरत्नवर झालेल्या विजयी सभेत नुतन आमदार राम सातपुते यांना माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील,मा.खा रणजितसिंह मोहिते-पाटील,जयसिंह मोहिते-पाटील,धैर्यशिल मोहिते-पाटील,साभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील,अर्जुनसिंह मोहिते-पाटील,शिवतेजसिंह मोहिते-पाटील, के.के. पाटील ,भाजपचे राजकुमार पाटील,सोपानराव नारनवर,शिवसेनेचे नामदेव वाघमारे , बाळासाहेब सरगर , काकासाहेब मोटे , हनुमंत सुळ आरपीआयचे सोमनाथ भोसले, किरण धईंजे, मिलिंद सरतापे, तसेच कार्यकर्ते, मामा पांढरे , मिलींद कुलकर्णी , संजय देशमुख ,आदीनी शुभेच्छा दिल्या.
राम सातपुते माध्यमांशी बोलताना म्हणाले की – माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील,रणजितसिंह मोहिते-पाटील व तालुक्यातील भाजपच्या सर्व नेते व कार्यकर्त्यांचे कष्ट जनतेच्या अर्शिवादाने मला विजयी केले आहे त्या सर्वाना मी माझा विजय समर्पित करतो.माळशिरस तालुक्याची सेवा मी माझ्या आई प्रमाणे करीन.