*शेतकरी अस्वस्थ असेल तर मी स्वस्थ बसणार नाही :- ना. रामदासजी आठवले*
शेतकरी अस्वस्थ असेल तर मी स्वस्थ बसणार नाही :- ना. रामदासजी आठवले
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (नाशिक)-दि.३- सध्या महाराष्ट्रात अतिवृष्टीने ओला दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली असून, शेतकर्यांच्या पिकांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. अगोदरच आलेल्या महापूराच्या पाण्यामुळे शेती पिकांचे तसेच पशुधनाचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यातूनच शेतकरीवर्ग सावरतोय न सावरतोय तोच अतिवृष्टीने हंगामी पिकांचे देखील नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याने राज्यातील शेतकरी पूर्णता हवालदिल होऊन खचला असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारता राज्यमंत्री भारत सरकार मा.ना. रामदासजी आठवले साहेब हे आज नाशिक जिल्ह्यातील निफाड व ओझर तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतीपिकांची पाहणी करणेसाठी आले असता म्हटले आहेत. यावेळी मोहोड येथील आत्महत्या ग्रस्त शेतकरी संजय भास्कर देशमुख यांच्या कुटुंबाला १ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. काकासाहेब खंबाळकर, नाशिक जिल्हाध्यक्ष मा. प्रकाशजी लोंढे, राज्य उपाध्यक्ष रविंद्र जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
*शेतकरी अस्वस्थ असेल तर मी स्वस्थ बसणार नाही. म्हणून लवकरच आपण केंद्रातील आमच्या सरकारच्या वतीने तसेच राज्य सरकारच्या वतीने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना भरीव अशी मदत करणार आहोत. यावेळी नाशिक जिल्ह्यातील महसूल विभागाचे तहसीलदार, कृषी अधिकारी यांचेसह रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.*