श्री नारायणदास रामदास विद्यालयात फटाके मुक्त दिवसळी उत्सहात
* श्री नारायणदास रामदास विद्यालयात फटाके मुक्त दिवाळी *नातेपुते(प्रमोद शिंदे)श्री नारायणदास रामदास प्राथमिकविद्यामंदिर मध्ये फटाके मुक्त दिवाळी विद्यार्थी व शिक्षक यांनी सामुदायिक शपथ घेतली यावेळी मुख्याध्यापिका श्रीम्. आगरखेड मॕडम म्हणाले,की आपण सर्वांनी दिवाळी आनंदात साजरी केली पाहिजे परंतु ही दिवाळी साजरी करत असताना हवेत होणारे प्रदूषण पण रोखता आले पाहिजे तसेच पर्यावरणाची हानी होणार नाही,माणसांना श्वसनाचे ञास होणार नाहीत,झाडे,वेली,फुले,पशु,पक्षी यावर ही परिणाम होणार नाही,तसेचआपणास कोणतीही ईजा होणार नाही,म्हणून आपण फटाके न उडविता प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करु या !दिवाळी साजरी करत असताना शिक्षकांनी दिलेला अभ्यासही पुर्ण करावा.वाचन दिन आपण साजरा केला आहे त्याचे एखादे तरी गोष्टीचे पुस्तक वाचन करावे. तसेच दिवाळी उत्सव आनंदाने साजरा करा पर्यावरणाची हानी म्हणजेच आपल्या भविष्याची हानी तसेच विद्यार्थ्यांना दीपावलीच्या शुभेच्छ दिल्या . त्यानंतर विद्यार्थ्यांना दिवाळी निमित्ताने खाऊवाटप करण्यात आला शिक्षक यावेळी शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यी उपस्थित होते .
शपथ वाचन नजमा पठाण यांनी केले.