नारायण दास रामदास प्राथमिक विद्यामंदिर इंदापूर येथे दीपावलीनिमित्त विविध उपक्रम

इंदापूर ( प्रतिनिधि )💐🏨🌹🏨👭👬👭👬आज दिनांक १९/१०/१९ श्री . नारायणदास रामदास प्राथमिकविद्यामंदिर प्रशालेत बालवाडी विभाग आणि इ. १ली ते ४थी विद्यार्थ्यांनी दिपावालीनिमित्त आयोजित विविध उपक्रमामध्ये सहभाग घेतला . बालवाडी मधील मुलांनी रांगोळी काढणे, रंगीत कागदाचे आकाशकंदिल 🏮बनविणे यात सहभाग घेतला . पहिलीच्या विद्यार्थ्यांनी विविध 🌷🌹🌸🌺फुलांचे हार स्वतः बनविले तर दुसरीच्या मुलांनी टाकाऊ📿 लेस,🎨 रंगीत खडे, डाळी अशा साहित्याचा वापर करत भेटकार्ड🧧 बनविण्याचा आनंद घेतला. इयत्ता तिसरी च्या विद्यार्थी वर्गाने जुन्या पणत्या रंगवून विविध साहित्य वापरून सजावट करुन त्या पणत्या नविन बनविल्या तसेच हार बनविण्याचा आनंद घेतला . इयत्ता ४ थी मुलींनी फुलांची रांगोळी रेखाटली आणि रंगीत आकाशकंदिल 🏮🏮स्वतः गोटीव कागदापासून तयार केले . अशाप्रकारे आज मुले विविध उपक्रमात मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने सहभागी झाले . शालेय सर्व सहकारी स्टाफने सहकार्य केले . सदर उपक्रमास मुख्याध्यपिका आगरखेड मॕडम यांनी मार्गदर्शन केले . 💐🏨👭👬🙏🏻🙏🏻