नातेपुते नगरपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे नातेपुते करांना जिवंत मृत मासे व दुर्गंधी युक्त दूषित पाणी पुरवठा


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रमोद शिंदे) नातेपुते ता.माळशिरस चे नुकतेच ग्रामपंचायतीचे नगरपंचायत मध्ये रूपांतर झाले असून कारभार ग्रामपंचायत कडून नगरपंचायत कडे गेल्यापासून नातेपुते कराना अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागत आहे.दिनांक 14 नोव्हेंबर रोजी पालखी मैदान येथील रंजीत कसबे यांच्या नळाला नगरपंचायत च्या हलगर्जीपणामुळे अक्षरशा जिवंत व मृत माशांचे दुर्गंधीयुक्त दूषित पाणी नळाद्वारे आल्याचे निदर्शनास आले.यामुळे नातेपुते येथील नागरिक नगरपंचायत च्या कारभारावर नाराज आहेत त्याचबरोबर अनियमित पाणी पुरवठा ही केला जात असल्यामुळे येथील लोक वैतागले आहेत.नगरपंचायत च्या नळाला एक दिवस आड पाणी असून येत असून तेसुद्धा दूषित पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.पाणी वेळेवर सुटत नसल्याने लोकांना कामावर जाता येत नाही.पाणी सुटण्याची वेळ काही ठिकाणी सकाळी दहा वाजल्यानंतर आहे व लोकांना कामावर जाण्याची वेळ ही नऊ वाजता असते त्यामुळे लोकांना पुरेसे पाणी भारता येत नाही पाण्यासाठी हातावर पोट भरणाऱ्या लोकांना रोजगार बुडवून एक दिवस आड पाणी भरावे लागते.या सर्व कारणांमुळे नगरपंचायत च्या कारभारावरती प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे याकडे नगर पंचायत चे मुख्य अधिकारी खांडेकर यांचे दुर्लक्ष असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे नातेपुते येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

You may have missed