एन.डी.एम.जे. कार्यकर्त्यांनी येणाऱ्या काळात राजकीय क्षेत्रात सक्रिय होण्याची गरज.. ॲड.डॉ.केवल उके
एन.डी.एम.जे. संघटनेची वार्षिक आढावा बैठक व कार्यकर्ता मेळावा थाटात संपन्न
कल्याण येथे नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस संघटनेची वार्षिक आढावा बैठक डाॅ केवल उके यांच्या अध्यक्षतेत संपन्न…
पुरोगामी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क कल्याण संदेश भालेराव –दिनांक १३ नोव्हेंबर २०२१ रोजी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे.) संघटनेचे बुद्धाभुमी फाउंडेशन, वालधुनी कल्याण येथे वार्षिक आढावा बैठक मोठया थाटात संम्पन्न झाली.
संघटनेचे राज्य महासचिव ॲड.डॉ.केवल उके यांच्या अध्यक्षतेत सदर बैठक आयोजित करण्यात आली होती. बुद्ध वंदना घेऊन आणि संघटनेच्या कार्याच्या चित्रीकरणाचे सादरीकरण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या मेळाव्याचे उद्घाटन राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य मा.किशोर मेढे यांच्या हस्ते करण्यात आले व आपले मनोगत व्यक्त करतांना संघटनेच्या विविध समाजउपयोगी कामाचा उल्लेख करून संघटनेला पुढील कार्यासाठी कोणत्याही शासकिय अडीअडचणीत मदत करण्याची हमी देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात.

सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्य मंत्र्यांचे स्विय सहाय्यक मा.प्रविण मोरे, वरिष्ठ विधीज्ञ ॲड.बी जी.बनसोडे, भंते गौतमरत्न, लॅपिवंग ग्रुपचे चेअरमन मा.विनोद जाधव, माजी आयकर अधिकारी मा.किशोर सोमकुवर, मॅक्स महाराष्ट्राचे प्रतिनिधी मा.किरण सोनवणे, रिपाई नेते अण्णासाहेब रोकडे इत्यादी उपस्थित होते. विचारमंचावरून उपस्थितांना संबोधन करत ॲड.डॉ.केवल उके यांनी एन.डी.एम.जे. कार्यकर्त्यांनी येणाऱ्या काळात राजकीय क्षेत्रात सक्रिय होण्याची गरज असल्याचे सांगत शक्य झाल्यास निवडणुका लढविण्याचे सुद्धा आव्हाहन केले.

यावेळी अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने गत वर्षाचा आढावा, येणाऱ्या २०२२ या वर्षाचे कृती कार्यक्रम आणि नियोजन, मीडिया ॲडव्होकसी, कॅलेंडर, माहितीपत्रक, वार्षिक अहवाल मॅगझिन आणि कमिटीचे बुकलेट तयार करणे, दरवर्षीचे नियोजित कार्यक्रम आर्थिक नियोजन इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली.

प्रत्येक जिल्ह्यातून वर्षभराच्या कार्याची ज्यामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या व कृती – कार्यक्रमांचा फोटो असेलेल्या व्हिडिओ क्लिपस् दाखविण्यात आल्या. यापैकी वर्ष २०२१ या वर्षभरात सर्वात उत्कृष्ठ काम करणाऱ्या सोलापूर, सांगली आणि पुणे या तीन जिल्ह्यांच्या एन.डी.एम.जे. कार्यकारिणीचा “डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट समाज कार्य पुरस्कार २०२०-२१” हा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. तसेच सातारा जिल्ह्यातील १७ खून प्रकरणात पेंशन मिळवून देणारे सातारा जिल्हाध्यक्ष मा.निवृत्तीतात्या रोकडे यांचे व जिल्हा कार्यकारिणीचे सुध्दा सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आले.
यावेळी राज्य, विभागीय, जिल्हा आणि तालुका स्तरावरील कार्यकारिनींची घोषणा करून उपस्थित पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे राज्य सहसचिव मा. पी.एस. खंदारे यांनी केले. संघटनेचे राज्य सचिव मा. वैभवजी गीते यांनी आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना संबोधित केले त्यावेळी संघटनेचे कार्य आणि संघटना कशी चालवावी, अन्याय अत्याचारा विरुद्ध बंड कसा करायचा आणि पीडित कुटुंबांना न्याय कसा मिळवून द्यायचा यावर आपले अनुभव व्यक्त केले. तसेच मा.वैभव गिते यांच्या विनंती वरून या वर्षी नोव्हेंबर/डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाअधिवेशन घेण्याचे नियोजन करण्याचा प्रस्ताव सुद्धा मंजूर करण्यात आला.
संघटनेच्या राज्य कार्यकारणी समितीमधील ऍड.अनिल कांबळे, मा.रमाताई आहिरे. मा.पंचशीला कुंभारकर, मा.शरद शेळके, मा.बी. पी. लांडगे, मा.प्रमोद शिंदे. मा.ऍड. रुचिता जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

विभागीय कार्यकारणी समितीमधील मा.बंदीश सोनवणे, मा.शशिकांत खंडागळे. मा. शोभा जाधव, मा.शशिकांत वाघ, मा.राहुल सावंत, मा.भारत गवई. मा.दादा जाधव, हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होते. ठाणे, पुणे, कल्याण, वाशीम, सोलापूर, सातारा, सांगली, उस्मानाबाद, लातूर, अहमदनगर, बीड, हिंगोली, धुळे, बुलढाणा, अकोला, यवतमाळ इत्यादी सह जवळपास १७ जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष व पदाधिकार्यांनी उपस्थिती दर्शविली.

कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन ठाणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आयु.विजय काबंळे व इतर पदाधिकारी मा.विकास चव्हाण, मा.संतोष बनसोडे, मा.विनोद रोकडे, मा.सुनीलजी ठेंगे, मा. संदेश भालेराव, ॲड. प्रविण बोदडे, मा. संदीप घुसळे, मा.विनोद भालेराव, मा.धनंजय सुर्वे, मा.श्रीकांत भोईर, मा.गुरुनाथ कशिवले, मा.सागर रोकडे, मा.विपुल पंडित, मा.गणेश अहिरे,मा.प्रतीक अहिरे, मा. मनोहर गायकवाड इत्यदिंनी केले. आयोजकांनी सर्व पाहुण्यांचे व उपस्थितांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.
