फुले एज्युकेशन तर्फे जयंती चित्रपट टीम चा सन्मान !!!
फुले एज्युकेशन तर्फे जयंती चित्रपट टीम चा सन्मान !!!
आजच्या आधुनिक काळात जयंती चित्रपटाने समाजप्रबोधनाचे काम केले आहे – सत्यशोधक रघुनाथ ढोक
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे / – फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अंड सोशल फौंडेशन तर्फे नुकतेच महापरिनिर्वाणदिनी हडपसर येथील वैभव सिनेमागृहात जयंती चित्रपट समन्वयक डॉ.वैशाली जगताप ,निर्माता शैलेश नरावडे,कार्यकारी निर्माता वैभव छाया , सह निर्माता अमोल धाकडे यांचा आजच्या काळात सह कुटुंबाला परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाणारा चित्रपट तयार करून पहाण्याची संधी दिली म्हणून संस्थेचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी सायंकाळी ७ चा शो महात्मा फुले यांच्या वेशभूषेत पाहून जयंती चित्रपट टीमचा थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची फोटोफ्रेम आणि शाल श्रीफळ देऊन येथोचीत सन्मान केला.यावेळी सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते राजेंद्र शेलार, जागृती न्यूज चँनेल संपादक विजय भुजबळ ,युवराज सावंत उपस्थीत होते.
या प्रसंगी सत्यशोधक रघुनाथ ढोक म्हणाले कि या जयंती चित्रपटात एक कमी शिकलेला मुलगा उनाड असतो तो काही कारणाने तुरुगात जातो तो सुधारावा म्हणून एक मागासवर्गीय शिक्षक तुर्गाधिकारी शी बोलून हिरो संथ्या चा संतोष करण्यात यशस्वी होतात कारण त्याला खरे महापुरुष कोण कशे, त्यांचे विचार काय आहेत हे युगपुरुष शिवाजी महाराज ,महात्मा फुले ,डॉ.आंबेडकर यांचे पुस्तके वाचनाचे गोडीतून कळते आणि त्यास जामीन देऊन काही दिवसांतच योग्य जिद्धीने आणि श्रमाने आपल्या जुन्या मित्राचे सहाय्याने पडेल ते कष्ट करून हॉटेल व्यवसायिक होतो .त्याचप्रमाणे एका मुलाचे आईवर बलात्कार झालेला असतो त्या केस साठी झालेली चुक सुधारून मदत करतो.स्वतःचे कुटुंबाला व इतरांना जवळ करतो.हे सर्व प्रसंग सर्वाच्या जीवनात घडत असतात त्यामुळे हा चित्रपट सर्वाना आवडतो आहे. सध्याचे वास्तव स्वरूप पदोपदी दिसत असल्याने उनाड व उनाड होणाऱ्या मुलांना योग्य परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाणारा व सर्व मागासवर्गीय समाजाला तसेच कुटुबाला एकत्रित बाधून टेवनारा हा जयंती चित्रपट आहे. हा चित्रपट निर्माण करून समाजाचे प्रबोधन करणारे मोठे काम केले आहे. अशा प्रकारचे चित्रपट यापुढे हि समाज प्रबोधनासाठी कायम निर्माण करावेत असे देखील शुभेच्या देऊन पुणेकरांना आव्हान केले की वाचन संस्कृती कमी होत चालल्याने सहकुटुंबाने सिनेमागृहात जावूनच हा जयंती चित्रपट पहावा.शासनाने हा चित्रपट आवर्जून मागासवर्गीय मुलामुलीच्या वसतिगृहातील मुलांना दाखवावा.तसेच तिकीट दर कमी होण्यासाठी अनुदान ध्यावे आणि जास्तीजास्त सिनेमागृहात हा चित्रपट लावण्यासाठी निवेदन पत्र देणार असल्याच्रे म्हंटले आहे.
यावेळी राजेंद्र शेलार म्हणाले कि आम्ही वाल्याचा वाल्मिकी होताना वाचले पण आज आम्ही प्रत्यक्ष संथ्याचा संतोष पाहून हा चित्रपट नक्कीच समाजातील मुलानावर चांगले संस्कार केल्याशिवाय रहाणार नाही.इतका चांगला चित्रपट दिला म्हणून सर्वाचे अभिनदन केले. यावेळी अनेक आदिवासी वसतिगृहातील मुलांनी चित्रपट आमच्यामध्ये टर्निग पॉईट असल्याचे म्हंटले.तर डॉ वैशाली जगताप यांनी सर्वाचे आभार मानले.
