मानव जन्म अत्यंत मौल्यवान आहे- श्री१०८ वर्धमान सागरजी महाराज
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे):-सर्वात मौल्यवान असलेला मानव जन्म हा आहे आपण मौल्यवान वस्तू जपून ठेवतो तसाच मानव जन्मही मौल्यवान असून जपून ठेवला पाहिजे.आपण जपला पाहिजे कारण मनुष्य जन्मानंतर मोक्ष प्राप्त होतो असे नातेपुते येथे श्री १०८ वर्धमान सागरजी महाराज यांनी जैन समाज बांधवांना प्रवचनात दरम्यान मार्गदर्शन केले पुढे ते म्हणाले.शरीर हे आत्म्याचे निवासस्थान आहे, एका इंद्रियेपासून पंचेंद्रियांपर्यंत, धर्मावर प्रेम केले पाहिजे कारण त्याचा आत्म्याला फायदा होतो आणि ८४लाख फेऱ्यांतून सुटका करून सिद्ध पद प्राप्त करता येते, असे शिक्षक सांगतात. भरत चक्रवर्तीला ३६००० राण्या होत्या, तो आनंदात मग्न होता, तरीही आश्चर्य का वाटतं की तो सुखांपासून अलिप्त होता, तो खूप संपत्ती, वैभव इत्यादी योजना आखत होता.आज टीव्हीचे युग आहे जे लोक टीव्ही बघतात व ते तेच आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात परंतु ते आत्म्याच्या हिताचे नाही, ते पुढे म्हणाले, “जेव्हा आम्ही छत्तीसगड येथे विहार करत होतो तेव्हा दुकानाचे नाव अरहंत शृंगार असे होते ते योग्य वाटत नाही देवाचे नाव हॉटेल व इतर ठिकाणी टाकू नये असे त्यांनी यावेळी प्रवचनात बोलताना सांगितले.
आचार्य श्री १०८ वर्धमान सागर जी महाराज यांचे नातेपुते येथे गुरुवारी सकाळी ७ वाजून१५ ला नातेपुते येथे त्यांचे आगमन झाले त्यावेळी सकल जैन समाज बांधवांनी व नातेपुते येथील नागरिकांनी त्यांचे भव्य असे स्वागत केले सकाळी साडेसहा वाजता मधुर मिलन मंगल कार्यालय मधून नातेपुते कडे त्यांनी प्रयाण केले व सव्वासात वाजता नातेपुते येथे त्यांचे स्वागत करण्यात आले ८ वाजून १५ मिनिटांनी आचार्यश्री चे जैन मंदिरामध्ये स्वागत करण्यात आले ,साडेआठ वाजता श्री आचार्य श्री चे पद प्रक्षालन पूजन ,शास्त्र भेट ,जपमाळ भेट, इत्यादी कार्यक्रम करण्यात आले ८ वाजून ४५ मिनिटांनी आचार्य जी चे मंगल प्रवचन करण्यात आले सकाळी साडेनऊ वाजता पंचामृत अभिषेक करण्यात आला.
सकल जैन समाज बांधवांनी भव्य अशा मिरवणुकीमध्ये ढोल ताशाच्या गजरात, धर्म पताका फिरवत श्री आचार्य १०८ वर्धमान सागरजी महाराज व त्यांच्या बरोबर असलेले सर्व जैन मुनि यांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.






