नातेपुते ऐतिहासिक नगर पंचायत निवडणुक 17 जागांसाठी 94 अर्ज दाखल
नातेपुते ऐतिहासिक नगर पंचायत निवडणुक 17 जागांसाठी 94 अर्ज दाखल
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-नातेपुते तालुका माळशिरस ही ऐतिहासिक नगरपंचायत निवडणूक असल्यामुळे या निवडणुकीला खूप महत्त्व आहे कारण पहिल्यांदाच नगरपंचायत स्थापन झाल्या मुळे पहिली निवडणूक होत आहे. त्या पहिल्या निवडणुकीला खूप मोठे ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे.त्यामुळे सतरा प्रभागातील नगरसेवक उमेदवार जागेसाठी 94 अर्ज दाखल झाले आहेत. ही निवडणूक महत्वपूर्ण सुद्धा राहणार आहे या निवडणुकीसाठी मोठे पक्ष भाजप, राष्ट्रवादी,शिवसेना, काँग्रेस,आरपीआय चिन्हावर लढणार नसून तर स्थानिक पातळीवर आघाड्या तयार करून निवडणूक लढवणार आहेत. ही निवडणूक पंचरंगी निवडणूक होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.त्यामध्ये माळशिरस नागरी आघाडी पुरस्कृत जनशक्ती आघाडी,तसेच निवडणूक पूर्व नोंदणी नागरी विकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी,राष्ट्रीय समाज पक्ष यासह अपक्ष ही मोठ्या प्रमाणात रिंगणात उतरले आहेत.यामध्ये वंचित बहुजन आघाडी व राष्ट्रीय समाज पक्ष हे पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.तर यातील एक आघडीला एक सारखी चिन्ह मिळणार असल्याचं संकेत आहेत.तर अपक्षांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामध्ये माळशिरस नागरी आघाडी22, महाराष्ट्र विकास आघाडी4, वंचित बहुजन आघाडी6, राष्ट्रीय समाज पक्ष6 अपक्ष 56 असे एकूण 94 अर्ज प्राप्त आहेत यामध्ये आणखीन आघाडी होण्याची शक्यता आहे.नातेपुते हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रमुख बाजारपेठ असून पुणे,सातारा,सोलापूर जिल्ह्या च्या बॉण्ड्री वर असल्याने नातेपुतेला खूप महत्त्व आहे.नातेपुते नगरपंचायत वर सर्वच पक्षांच्या नेत्यांचे लक्ष आहे विधानसभा व लोकसभा निवडणुकीला नातेपुते हे शहर महत्त्वाचे मानले जाते.म्हणून सर्व नेत्यांचे लक्ष नातेपुते शहरावर असून प्रत्येक पक्षाच्या प्रमुख नेत्यांना सत्तेच्या चाव्या हातात घ्यायच्या आहेत.राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर हे स्वतः त्यांच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी नातेपुते शहरात उपस्थित होते.नातेपुते ही 88 वर्षापूर्वी स्थापन झालेली ग्रामपंचायत विसर्जित होऊन नव्याने नगरपंचायत झाल्यामुळे नवीन उमेदवार निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.व पहिला नगरसेवक होण्याचा मान मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.यातील किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहतील हे छाननी नंतरच समजणार आहे.नातेपुते नगर पंचायत निवडणूक प्रक्रियेचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कारंडे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी माधव खांडेकर हे पाहात आहेत.









