जात पडताळणी समिती अध्यक्ष उपस्थित नसल्यामुळे विद्यार्थी गॅसवर
जात पडताळणी समिती अध्यक्ष उपस्थित नसल्यामुळे विद्यार्थी गॅसवर




पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –आज दिनांक सहा डिसेंबर रोजी सोलापूर येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालय येथे जात प्रमाणपत्र काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.काही विद्यार्थ्यांनी एकमहिना ,दोन महिने,तीन महिने अगोदर जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल केले होते. परंतु त्यांना जात पडताळणी कार्यालय यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा मेसेज न आल्याने विद्यार्थी व पालक थेट जातपडताळणी समिती कार्यालयात धडकले. उद्या 7 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत इंजिनिअरिंग च्या विद्यार्थ्यांचा प्रवेश प्रक्रियेचा शेवटचा दिवस असून जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यास विद्यार्थ्यांचा प्रवेश होऊ शकत नाही.असे असतानाही जात पडताळणी कार्यालयात जात पडताळणी समितीचे सन्मानीय अध्यक्ष साहेब कार्यालयात उपलब्ध नसल्याने विद्यार्थी भलतेच अडचणीत सापडले आहेत.जात पडताळणी समिती सचिव व उपायुक्त यांच्या प्रकरणावरती सह्या झाल्या असून अध्यक्षांची सही राहिल्यामुळे आज विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळू शकले नाही.सध्या अध्यक्ष सांगली येथे असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.प्रकरण सांगली येथे अध्यक्षांच्या सहीसाठी संध्याकाळी रवाना होणार व नंतर पोर्टलल अपलोड केली जाणार सोलापूर येथून सांगली ला जायला चार तास लागतात व येण्यासाठी चार तास लागतात संध्याकाळी सहा वाजल्या तरी सोलापूर येथील प्रक्रिया पूर्ण झाली नाही.जर विद्यार्थ्यांनी उद्या सकाळी ॲडमिशन प्रक्रियेला जात पडताळणी प्रमाणपत्र मिळाले नाही तर विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.विद्यार्थ्यांना दोनशे किलोमीटरचा प्रवास करून कॉलेज ला जायच आहे.जात पडताळणी प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे या विद्यार्थ्यांचे भवितव्य सध्या अंधारमय दिसत आहे.जर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले तर याला जबाबदार कोण? असा सवाल या ठिकाणी निर्माण झाला आहे.अगोदर जात प्रमाणपत्र काढण्यासाठी विद्यार्थ्यांना कागदांची जुळवाजुळव करण्यासाठी पराकाष्टा करावी लागते वेळ आणि पैसे सुद्धा मोठ्या प्रमाणात खर्च करावे लागतात त्यातून असा प्रकार घडला तर विद्यार्थी खचून जातो नाउमेद होतो.विद्यार्थ्यांकडून लवकर जात प्रमाणपत्र मिळण्याची मागणी करण्यात येत आहे.तसेच प्रवेश प्रक्रियेला वाढीव मुदत देण्याची मागणी ही विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र मिळाले नाही म्हणून प्रवेश मिळाला नाही तर अशा विद्यार्थ्यांची जबाबदारी संबंधित विभागाचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे साहेब व संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनीच घ्यायला हवी या प्रकरणांमध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी लक्ष घालण्याची मागणी पालकांतून होत आहे.