जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या वाढदिवसानिमित्त नातेपुते नगरपंचायतीच्या वतीने वृक्षारोपण
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे) सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी मिलिंद शंभरक यांच्या वाढदिवसानिमित्त नातेपुते नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महादेव खांडेकर यांच्यावतीने 55 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. माझी वसुंधर या कार्यक्रमा अंतर्गत पर्यावरण संवर्धन राखण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले होते.वृक्षारोपण करतेवेळी नगरपंचायत चे मुख्य अधिकारी महादेव खांडेकर म्हणाले की आपण सर्वांनी आपल्या आवडत्या व्यक्ती,मित्र आदर्श व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तींच्या वाढदिवसानिमित्त आपण सुद्धा वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धन करण्यासाठी मदत केली पाहिजे या कार्यक्रमास नगर पंचायत चे सर्व कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.


