आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांनी देशासाठी ब्रिटिशांशी संघर्ष केला-बाबाराजे देशमुख

आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांनी देशासाठी ब्रिटिशांशी संघर्ष केला-बाबाराजे देशमुख
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)-क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांनी देशासाठी ब्रिटिशांशी संघर्ष केला. बहुजन समाजातील इतिहासकारांनी इतिहास उलगडण्याच काम केलाआहे.लहुजी वस्ताद साळवे हे उत्कृष्ट तलवारबाज व दांडपट्टू होते.त्यांनी युवकांना तलवारबाजी शिकून ब्रिटिशांविरुद्ध बंड केले.लहुजी वस्ताद साळवे यांच्या 227 व्या जयंतीनिमित्त माजी जि.प उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणात लहुजी विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.तसेच प्राध्यापक उत्तम सावंत यांनी लहुजी वस्ताद साळवे यांच्या विषयी बोलताना म्हणाले की लहुजी साळवे म्हणजे भारताच्या क्रांतीची छाप आहे.

लहुजी सांगताना आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक व महात्मा फुले हे देखील सांगावे लागतात.आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक व महात्मा फुले यांच्या विचारधारेवर लहुजी वस्ताद यांनी काम केले.महाराष्ट्रात परिवर्तनाची साखळी पूर्वीपासून आहे.विद्रोही संत तुकाराम महाराज,छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिराव फुले,लहुजी वस्ताद डॉ. बाबासाहेब आंबेडकर,अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची सांगड आहे.लहुजी वस्ताद यांनी वयाच्या 85 वर्षापर्यंत क्रांतीच्या चळवळीचं काम केलं.प्रा.उत्तम सावंत म्हणाले की युवकांनी शिक्षणाची कास धरून निर्व्यसनी राहिले पाहिजे.कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी हलगी वादन, दांडपट्टा,लाठी काठी, टेंभा लाठी फिरवणे अशा शौर्य पराक्रम चे खेळ दाखवले.या कार्यक्रमास सोलापूर जिल्हा माजी उपाध्यक्ष रेणुका पतसंस्थेचे चेअरमन बाबाराजे देशमुख,कृषी उत्पन्न बाजार समिती उप सभापती मामासाहेब पांढरे,नातेपुते पोलीस स्टेशनचे पीएसआय तानाजी पवार,महेश शेटे,माऊली पाटील, मालोजीराजे देशमुख,प्रा.उत्तम सावंत,संतोष काळे बाळासाहेब पांढरे,विशाल साळवे,भैय्यासाहेब चांगण समीर शेख,रोहित शेटे,महादेव तूपसुंदर,बाळासाहेब सपताळे,अजित शिरतोडे,बाळासाहेब चव्हाण, सोमनाथ भोसले,गुरु कर्चे,महेश लांडगे,बाळासाहेब लांडगे,शुभम लांडगे,नितीन लांडगे,अनिल लांडगे दादासो लांडगे,आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन लहुजी शक्ती सेनानानासाहेब रणदिवे नंदू लांडगे विनोद लांडगे यांनी केले होते सूत्रसंचालन औदुंबर बुधावले पाटील यांनी केले तर आभार बाबासाहेब लांडगे यांनी व्यक्त केले.







