श्री 1008 महावीर स्वामी दिगंबर अतिशय क्षेत्र दहिगाव येथे विविध उपक्रमाने रथोउत्सव उत्साहात संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-दहिगाव तालुका माळशिरस येथे सालाबाद प्रमाणे याहीवर्षी रथोउत्सव उत्साहात संपन्न झाला. रथोउत्सवानिमित्त श्री 1008 महावीर स्वामी दिगंबर जैन अतिशय क्षेत्र दहिगाव येथे सलग तीन दिवस विविध उपक्रम राबवण्यात आले.

उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी श्री भगवान महावीर यांच्या मूर्तीला श्रीफळ चढवून व अभिषेक करून भगवंताची मूर्ती सकाळी सात वाजता धर्म रथा मध्ये विराजमान केली गेली होती.तसेच गाव प्रदक्षणा करून शोभा यात्रा काढण्यात आली.ही शोभायात्रा पाच मजली भव्य लाकडी रथातून काढण्यात आली.या रथाचे वैशिष्ट्य असे की रथाच्या समोर चार पांढरे लाकडी घोडे आहेत.रथाला संपूर्ण फुलाने सजवले जाते.रथाच्या भोवतीश्रीफळ व धर्म पताका लावले जातात.रथाला अठरा पगड जातीतील लोक गावभर ओढून शोभायात्रा काढतात.

रथ ओढत असताना अहिंसा परमो धर्म,भगवान महावीर की जय अशा जयघोषाच्या घोषणा दिल्या जातात.तसेच तो भव्य धर्मरथ साडेअकरा वाजता पंडिताच्या माळावर नेला जातो.

पंडिताच्या माळावर सर्व लोक रथा मधील भगवंताचे दर्शन घेतात.व तिथे सभामंडपाचे उद्घाटन केले जाते.सभामंडपामध्ये संगीताचा कार्यक्रम व चढाव्यांच्या बोली होतात.

रथोत्सव हा कार्तिकीच्या पंचमीला सुरु होऊन सप्तमीला समाप्त होतो.या तीन दिवसात मोफत आरोग्य शिबिर दररोज संगीताचा कार्यक्रम अभिषेकाचा कार्यक्रम चढावे भगवंताच्या मूर्तीचे रथामधून गाव प्रदक्षणा मोठ्या उत्साहात गाजत वाजत केली जाते अशा पद्धतीने सर्व जैन बांधव एकत्र येऊन अठरापगड जातींना सोबत घेऊन रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात.


दहिगाव गाव येथील वैशिष्ट्य म्हणजे येथे अतिशय क्षेत्र या ठिकाणी एक दिवस भगवान महावीर वास्तव करून गेल्याचे सांगितले जाते म्हणून या ऐतिहासिक ठिकाणाला महाराष्ट्र व देशामध्ये खूप मोठे महत्त्व आहे.
