जि.प.शाळा पिरळे येथे पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल च्या वतीने संविधान दिन विविध उपक्रमाने साजरा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिरळे येथे पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या वतीने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संविधान दिनानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप व  संविधान उद्देशिका वाटप करून सामूहिक संविधान वाचन करण्यात आले.26/11 मध्ये शहीद झालेल्या पोलीस बांधवांना अभिवादन करण्यात आले.तसेच सातारा जिल्ह्यातील सतरा कुटुंबाचे पुनर्वसन केल्याबद्दल एन. डी.एम.जे.चे राज्य सचिव वैभव गिते साहेब यांचा सरपंच संदीप नरोळे व ग्रामपंचायत पिरळे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.तसेच ग्रामपंचायत च्या वतीने 14 वा वित्त आयोग फंडातून दोन लाख सत्तर हजार रुपयाचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिरळे यांना शालेय उपयोगी साहित्य  देण्यात आले.तसेच पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या वतीने गुणवंत विद्यार्थी,पालक व राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल मुख्याध्यापक शंकर शिंगाडे सर व ढवळे सर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मुलाने सर मुलाने मॅडम बरडकर सर नामदेव मॅडम शेंडगे मॅडम खरात सर यांचा पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या वतीने सत्कार करण्यात आला. व मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या अंगणामध्ये वृक्षरोपण करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर साहेब, एन.डी. एम.जे.चे राज्य सचिव वैभव गिते साहेब, महाराष्ट्र विद्युत वितरण चे सहाय्यक अभियंता दीपक कंकाळे,विद्युत नियामक मंडळ आयोग  सदस्य श्रीकांत बाविस्कर, प्रमोद शिंदे, जित खंडागळे यांनी  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास एपीआय मनोज सोनवलकर,वैभवजी गीते,सरपंच संदीप नरोळे,उपसरपंच उमेश खिलारे, केंद्रप्रमुख बाबासाहेब झोडगे,बरडकर सर,मा.सरपंच ज्ञानदेव शिंदे,महादेव शिंदे,दत्ता रुपनवर,शालेय शिक्षण समिती अध्यक्ष अजित खंडागळे,एकशिव ग्रामपंचायत सदस्य दत्ता कांबळे ग्रामपंचायत सदस्य गणेश दडस,मोहन पवार,भाऊसाहेब भिसे व अनेक प्रतिष्ठित ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने संखने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक शिंगाडे सर व ढवळे सर,जब्बार मुलाणी सर,खरात सर,निगडे सर, शेंडगे मॅडम,मुलाणी मॅडम,नामदे मॅडम सर्व शिक्षक स्टाफ यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे आयोजन पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल चे संपादक प्रमोद शिंदे व प्रशांत खरात यांच्या वतीने करण्यात आले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ढवळे सर तर आभार मुख्याध्यापक शंकर शिंगाडे यांनी व्यक्त केले.

सातारा जिल्ह्यातील अत्याचार पीडित असलेले सतरा कुटुंबियांचे पुनर्वसन केल्याबद्दल पिरळे ग्रामपंचायतीच्या वतीने एन डी एम जे राज्य सचिव वैभव गीत यांचा सन्मान करण्यात आला
प्रतिमा पूजन करताना एपीआय मनोज सोनकर साहेब

You may have missed