एन.डी.एम.जे.कल्याण डोंबिवलीतील शहर जिल्हाध्यक्ष ॲड.प्रविण बोदडे चां वाढदिवस अनेक सामाजीक उपक्रमांनी साजरा..!

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क कल्याण (संदेश भालेराव) दिनांक २८\११\२०२२रोजी
ठाणे जिल्ह्यातील कर्तव्यनिष्ठ व्यक्तीमत्व संकट काळात पीडितांच्या मदतीला धाव घेणारे , गरजूंना मायेची साथ देणारे, अन्याला वाचा फोडणारे सर्वधर्मसमभाव जपणारे अशी भूमिका घेऊन, अन्याय करणाऱ्याना धडा शिकविणारे ठाणे जिल्ह्यातील डॅसिंग व्यक्तिमत्व वकीली मध्ये उत्कृष्ठ बदल घडवणारे कार्यकुशल कायद्याच्या माध्यमाने सरकारला धारेवर धरणारे व नॅशनल दलित मूव्हमेंट फाॅर जस्टीसचे कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्ष ,वंचित बहुजन आघाडी कल्याण चे व बहुजन बहुउदेशीय सामाजिक सांस्कृतिक संस्थेतील न्यायविधी सल्लागार कल्याण पश्चिम चे मूळ रहिवाशी समाज सेवक तथा उत्कृष्ठ वकील आयु. ॲड.प्रविणजी बोदडे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक सामाजीक उपक्रम राबवून आपला जन्मदिन साजरा केला.

ॲड.प्रविणजी बोदडे यांना नॅशनल दलित मुव्हमेट फ़ॉर जस्टिस महाराष्ट्र राज्य, ठाणे जिल्हा टिम कल्याण डोंबिवली शहरजिल्हा टिम, पुरोगामी महाराष्ट्र न्युज नेटवर्क ,वंचित बहुजन आघाडी मोहने ,AISCST नॅशनल रेल्वे यूनियन, यांनी जन्मदिनाच्या शुभेच्छा व्यक्त करून पुढील वाटचालीस शुभकामना व्यक्त केल्या.

सामाजीक कार्यकर्ते तथा वकील ॲड.प्रविणजी बोदडे यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यास एन .डी. एम .जे .महाराष्ट्र राज्य महासचिव तथा महिला बालविकास मार्गदर्शक मंत्रालाईन सदस्य मा.अ‍ॅड.डाॅ.केवलजी उके साहेब, तसेच R.p.i चे सावंत दादा ,
एन.डी.एम.जे. ठाणे जिल्हाअध्यक्ष मा .विजय काबंळे, ठाणे जिल्हा,उपाध्यक्ष मा.विकासजी चव्हाण, प्रसिद्धीप्रमुख संदेश भालेराव, AISCST नॅशनल युनियन चे अध्यक्ष सुनीलजी ठेंगे ,तसेच बहुजन बहुउदेशीय सामाजिक सांस्कृतिक संस्थेतील पदाधिकाऱी रमेश अडसुअळे,नथुराम मोहिते,श्रीधर शिंदे,अविनाश, बावस्कर, विक्रम जाधव,रवींद्र भांबरे,दिपक वाघ, कपिल पगारे,सुरेश शिंदे,सुनिताताई राजगुरू मोहना शहर प्रमुख वार्ड अध्यक्ष संगिता माने सुरेश घोडेराव ह्यांच्या उपस्थितीने सर्व प्रथम बूद्ध वंदना घेउन प्रविणजी बोदडे यांचा वाढदिवसाचा केक कापुन शाल व पुष्पगुच्छ देऊन जन्मदिनाच्या मंगल कामना व्यक्त करून पुढील कार्यास मान्यवरांनी सदिच्छा व्यक्त केल्या.व कार्यक्रमा चे सुञ संचालन प्रा.विकासजी चव्हाण यांनी केले व कार्यक्रम संपन्न झाला

You may have missed