पुरोगामी महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- पुरोगामी महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचा निकाल डॉ.केवल उके यांनी जाहीर केला आहे. हा निकाल शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील,बाबाराजे देशमुख,मुख्य अधिकारी माधव खांडेकर व पत्रकार बांधव यांच्या हस्ते जाहीर करण्यात आला.पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या वतीने दरवर्षी विविध स्पर्धेचे आयोजन केले जाते त्याचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या थाटात आयोजित केला जाते. तसेच शैक्षणिक, राजकीय, सामाजिक,क्रीडा, औद्योगिक,सांस्कृतिक,वैद्यकीय शासकीय,क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षक,विद्यार्थी,कर्मचारी,अधिकारी ,कलाकार यांचासुद्धा विशेष पुरस्कार देऊन सन्मान केला जातो.तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात.स्पर्धेच्या माध्यमातून झाडे लावा झाडे जगवा, बेटी बचाव बेटी पढाव,पाणी आडवा पाणी जिरवा, जलशक्ति व स्वच्छता विषय महाराष्ट्रातील अनेक शाळेमध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवले जातात.आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या व वनविभागाच्या माध्यमातून दीड लाख वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.वृक्ष लागवड केलेल्या झाडाचा वाढदिवस साजरा केला जातो. तसेच संविधान दिन ,15 ऑगस्ट, 26 जानेवारी, महापुरुषांच्या जयंती निमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य,कपडे वाटप केले जातात. पूरग्रस्त व कोरोना काळात लोकांना अन्नधान्य देऊन मदत केली आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे यंदा ऑनलाइन राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते.विभागात या स्पर्धेमध्ये 18 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. ही चित्रकला स्पर्धा इयत्ता पहिली ते चौथी ,इयत्ता पाचवी ते आठवी,इयत्ता नववी ते बारावी या तीन गटात स्पर्धा आयोजित केली होती पहिल्या गटासाठी विषय होते झाडे लावा झाडे जगवा,पाणी आडवा पाणी जिरवा. दुसऱ्या गटासाठी वैयक्तिक स्वच्छता काळाची गरज, बेटी बचाओ बेटी पाढाओ, तिसऱ्या गटासाठी संकट काळात देशाला पोलिसांचे योगदान, संकट समयी देशासाठी पत्रकार व मीडिया चे योगदान,अशाप्रकारे विषय होते.या स्पर्धेत पहिल्या गटात प्रथम क्रमांक ईश्वरी कुलभूषण रोटे इ. 3 री रत्नप्रभादेवी मोहिते पाटील प्राथमिक शाळा नातेपुते, विभागून सूर्यम बाबासाहेब सस्तारेइ.१ली रामदास नारायणदास विद्यामंदिर इंदापूर, *द्वितीय क्रमांक- शौर्य मोहन पवार इ.2 री एस एन डी इंटरनॅशनल स्कूल नातेपुते,आरोही हनुमंत सोनवलकर इ.१ली.जि.प.शाळा मोरोची, *तृतीय क्रमांक निलेश संजय धिंदळे इ.४थी.लोकमान्य प्रा.विद्यालय मुलुंड, स्वरा हनुमंत साळुंखे३री जि.प.प्रा मोरोची,
*दुसऱ्या गटात प्रथम क्रमांक-तनवी प्रशांत साळुंखे.इ.७वीशारदाबाई पवार विद्यानिकेतन बारामती, तनिष्का दिनेश कुलकर्णी इ.८वी.सिंहगड सिटी स्कूल कात्रज पुणे, *द्वितीय क्रमांक- सिद्धी शिवाजी गर्जे इ.८वी. हुजुरपागा स्कूल कात्रज पुणे, भक्ती कुलभूषण रोटेइ.७वी.श्री रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालय नातेपुते, *तृतीय क्रमांक – प्रणिता चंद्रकांत दणाने इ.७वी. शारदाबाई पवार विद्यानिकेतन बारामती,अक्षरा उमेश पोतदार इ.६वी चंद्रकांत घुगरदरे प्रशाला नातेपुते,
*तिसर्या गटात प्रथम क्रमांक- अश्विनी बाळू स्वामी इ.१०वी. हुजूर पागा स्कूल कात्रज पुणे, नवदिशा मार्तंड देवकातेइ.१२वी बा.ज दाते प्रशाला नातेपुते, द्वितीय क्रमांक- सोनाली हौसराव कोळी इ.12वी. साहेबराव फडतरे ज्युनिअर कॉलेज कळंब, पियुषा विक्रम कुमार पालवे इ.१२वी. विजयसिंह मोहिते पाटील विद्यालय अकलूज, तृतीय क्रमांक- पायल राजेंद्र गवळीइ.12वी. बा.ज दाते प्रशाला नातेपुते, अंजली आनंदराव बोराटे समता इंग्लिश स्कूल ९वी. या विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये यश संपादन केले आहे.सर्व विद्यार्थ्यांचे संचालक डॉक्टर केवल उके, प्रमोद शिंदे,प्रशांत खरात यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण केले जाईल लवकरच बक्षीस वितरण सोहळ्याची तारीख सर्व विद्यार्थ्यांना कळवण्यात येईल असे.ऍड डॉ.केवल उके यांनी सांगितले.


















रंगभरण स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा




















