राजस्थानमध्ये बजेटचा कायदा मंजूर दिल्लीत एन.डी.एम.जे संघटनेचा आनंदोत्सव साजरा

महाराष्ट्रात बजेटचा कायदा करण्यासाठी संघर्ष करणार..ऍड. केवल उके
राजस्थान सरकारचा आदर्श घेत महाराष्ट्राने बजेटचा कायदा करावा अन्यथा आंदोलन करणार….वैभव गिते.
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क दिल्ली: प्रतिनिधी
बौद्ध,दलित आदिवासी, अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचा प्रगतीचा व योजनांचा निधी अखर्चित राहू नये तसेच निधी इतरत्र वळवू नये.म्हणून नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या वतीने पाठपुरावा सुरू आहे.राजस्थान मधील वरिष्ठ नेते ऍड.सतीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली राजस्थानमध्ये सहयोगी संघटनांना सोबत घेत मागील दहा वर्षांपासून बजेटचा कायदा लागू करण्यासाठी संघर्ष सुरू होता.

अखेर राजस्थान सरकारने मागील काही दिवसांमध्ये बजेटचा कायदा लागू केल्यामुळे दिल्लीत इंडियन सोशल इन्स्टिट्यूट येथे नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राष्ट्रीय महासचिव ऍड.राहुल सिंग,महाराष्ट्र राज्य महासचिव ऍड.केवल उके,राज्य सचिव वैभव गिते यांच्याहस्ते ऍड.सतीश कुमार यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला यावेळी आनंदोत्सव साजरा करताना ऍड.केवल उके यांनी राजस्थान मधील एन.डी.एम.जे संघटनेच्या सर्व सहयोगी संघटनांचे,नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे आभार मानले

तसेच महाराष्ट्रात बजेटचा कायदा लागू करण्यासाठी अधिकची मेहनत घेणार असल्याचेही उके यांनी सांगितले. वैभव गिते यांनी राजस्थान सरकारचा आदर्श महाराष्ट्र सरकारने घ्यावा आणि बजेटचा कायदा मंजूर करावा असे बोलून महाराष्ट्र शासनाचा खरपूस समाचार घेतला. यावेळी राष्ट्रीय टीमच्या श्वेता गमरे,देबाजानी या उपस्थित होत्या.राज्य महिला संघटक पंचशीलाताई कुंभारकर यांनी आभार व्यक्त केले.
