पिरळे येथे प्रथमच तीन मजली रथाच्या साह्याने श्री महालक्ष्मी यात्रेस प्रारंभ
पिरळे येथे प्रथमच तीन मजली रथाच्या साह्याने श्री महालक्ष्मी यात्रेस प्रारंभ
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
पिरळे तालुका माळशिरस येथे सालाबाद प्रमाणे श्री महालक्ष्मी यात्रेस प्रारंभ झाला आहे.यावर्षीच्या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे तीन मजली सागवानी भव्य रथाने यात्रेची सुरुवात करण्यात आली. हा सागवानी रथ जवळपास दोन टनांपेक्षा जास्त वजनाचा असून गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी तो रथ ओढत गावा प्रदक्षणा पूर्ण करून श्री महालक्ष्मी मंदिर या ठिकाणी दोन ते तीन किलोमीटर आंतर ओढून नेला असून या रथामध्ये श्री महालक्ष्मी पालखीमध्ये विराजमान करण्यात करण्यात आली.

रथाच्या पुढे पारंपारिक गजी ढोल ,सनई सुर, हलगी च्या तालावर वाजत गाजत महालक्ष्मी मंदिराकडे नेण्यात आला. हा रथ बनवण्यासाठी तब्बल दीड वर्षाचा कार्यकाळ लागला आहे. तसेच हा लाकडी सागवानी रथ बाळासाहेब भिसे,चंद्रकांत भिसे व सूर्यकांत भिसे या कुटुंबीयांनी बारा लाख रुपये खर्च करून भाविकांसाठी भेट दिला आहे. रथा पाठीमागचा उद्देश त्यांचा नवस व गावातील यात्रेची शोभा वाढावी सर्व लोकांनी एकत्र येऊन यात्रा उत्साहात करावी. यासाठी हा रथ भिसे कुटुंबियाकडून देवस्थानाकडे सुपूर्त करण्यात आला यावेळी गावचे माझी सरपंच ज्ञानदेव शिंदे,यात्रा प्रमुख दशरथ जाधव, सरपंच संदीप शेठ,नरोळे उपसरपंच खिलारे, पैलवान-पाटणेकर कुटुंब, माजी सरपंच महादेव शिंदे, संभाजी साळवे,पाटील औदुंबर बुधावले, शिवाजी लवटे पाटील यात्रा कमिटी अध्यक्ष दादासाहेब शिंदे,प्राचार्य दीपक शिंदे व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित.
