जवळा नि गावात राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरू करा. आजिनाथ राऊत
जवळा नि गावात राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरू करा.
पोरगा महाराष्ट्र नेटवर्क – मुख्यमंञी उध्दवजी ठाकरे साहेबांकडे राऊतांनी केली मागणी…
गावात जर राष्ट्रीयीकृत बँकेची मुख्य शाखा असती तर गावातील एस.बी.आय.ग्राहक सेवा केंद्र चालक आश्रु कारकर याने गोरगरीब जनतेचा विश्वास संपादन करुन लाखो रुपये घेऊन पळुन जाऊन केलेल्या फसवनुकीच्या प्रकारास गावासह आसपासच्या खेड्या पाड्यातील ग्राहक बळी पडले नसते अशी खंत मा. जिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांचेशी चर्चा करताना व्यक्त केली
परांडा तालुक्यातील राजकीय, सामाजिक, कृषी व आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे गाव असलेल्या जवळा नि गावामध्ये वारंवार राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरू करण्याची मागणी नँशनल दलीत मुव्हमेंट फाँर जस्टिस (एन.डी.एम.जे.) संघटणेव्दारे जिल्हाध्यक्ष आजिनाथ राऊत यांनी सबंधित विभागांना यापुर्वीच केल्या आहेत. तरीसुध्दा बँकेची शाखा सुरु करत नसल्याने ग्रामस्थातुन संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत,
गावांतील लोकांना राष्ट्रीयीकृत बँकेतील व्यवहार करण्यासाठी परंडा,बार्शी,भुम,येथे किमान 23 किलोमीटर व मानकेश्वर येथे 11 किलोमीटर जावे लागते. केंद्र व राज्य शासनांच्या अनेक योजना, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी. शासनाच्या विविध कर्जयोजनांचा लाभ घेण्यासाठी, शेती पीककर्जासह सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी तसेच महत्वाच्या इतर बाबींसाठी नेहमीच बँकेची गरज लागत असते.
म्हणुन राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरू करावी. त्यासाठी जागेपासून हवी ती मदत देण्यास आम्ही तयार असल्याचे जिल्हाध्यक्ष आजिनाथ राऊत व गावचे सरपंच नवजीवन चौधरी यांचे म्हणणे आहे. गावच्या अडचणी लक्षात घेऊन. गावात राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरू व्हावी यासाठी आम्ही नँशनल दलीत मुव्हमेंट फाँर जस्टिस (एन.डी.एम.जे.) संघटणेच्या वतीने वेगवेगळ्या स्तरावर पाठपुरावा करत आहोत. गावात बँक यावी म्हणुन जवळा नि गावासह आजूबाजूच्या गावांचे ठरावही करून दिले आहेत. राष्ट्रीयीकृत बँक गावची खुप महत्वाची गरज असल्याने लीड बँकेने,जिल्हाधिकारी साहेबांनी,मुख्यमंञी महोदयांनी ग्रामस्थांच्या अडचणींचा व एन.डी.एम.जे.संघटणेच्या मागणीचा विचार करून जवळा नि गावात नव्याने राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरू करावी अशी मागणी लेखी निवेदनाव्दारे जिल्हाधिकारी उस्मानाबाद मार्फत मुख्यमंञी महोदयांना केली आहे सदर निवेदनावर जिल्हाध्यक्ष आजिनाथ राऊत यांची स्वाक्षरी आहे