पिरळे येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळा उत्साहात संपन्न
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
पिरळे ता माळशिरस येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच 38वा अखंड हरिनाम सप्ताह दि.4मे ते 11मे या कालावधी मध्ये उत्साहात संपन्न झाला. हा सप्ताह दरवर्षी महाराष्ट्रातील प्रसिद्ध विष्णू नारायण मंदिर पिरळे येथे सालाबादप्रमाणे आयोजित केला जातो.


याही वर्षी मोठ्या उत्साहात हा सोहळा संपन्न झाला. या सप्ताह सोहळ्यामध्ये ह भ प राज कदम सर बारामती, स्वप्निल महाराज पवार फोंडशिरस, नवनाथ महाराज मारकड इंदापूर, विठ्ठल महाराज फड बीड, चैतन्य महाराज बारवकर निमगाव केतकी, युवराज महाराज देशमुख आळंदी, केशव महाराज मुळीक लासुर्णे, शिवाजी महाराज काळे औरंगाबाद, यांची सुश्राव्य अशी कीर्तन सेवा झाली.

तसेच या कीर्तन सोहळ्यात साहेबराव जाधव, संताराम माने, सोमनाथ निकम, कांतीलाल माने, जगन्नाथ लवटे, किसन वाघ, भारत माने, चंद्रकांत जाधव, माणिक लवटे, सुनील दळवी, बापूराव जाधव, शहाजी माने, प्रकाश रुपनवर, रामलिंग नरोळे, महादेव जगन्नाथ शिंदे, दत्तात्रय रुपनवर, कालिदास नरळे, सुभाष लवटे, बाजीराव दडस, शरद वाघ, यांनी अन्नदान केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ह.भ.प.धनंजय महाराज कदम ,चंद्रकांत जाधव ज्ञानदेव शिंदे, अजित महाराज खंडागळे, भाऊसाहेब भिसे सर, मोहन महाराज बुधावले, जोतिराम भिवरकर, सोमनाथ गायकवाड, विकास दडस, सुनील दळवी,मामा लवटे,सुनील कुशाबा माने, ऋषिकेश कदम, अजिनाथ होळकर,सोमनाथ वाघ तसेच मंडळातील सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थांनी सहकार्य केले.या सोहळ्यास ज्ञानदेव फुले सर, सोमनाथ घोगरे, चंद्रकांत दीक्षित सर, सरपंच अलकाताई नरोळे, पो.पाटील औदुंबर बुधावले तसेच पिरळे ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भजनी मंडळ उपस्थित होते.

